ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘त्या’ शिक्षीकेने दिली जनतेला हरीत दिवाळीची प्रेरणा

चांदा ब्लास्ट

     मा.सवौच्च न्यायालयाने फटाके उधळण्यासंबंधाने नियमावली दिली, शासनाने यंदा हरीत दिवाळीची मानसिकता वाढविण्यासाठी जनजागृती केली.मात्र प्रदूषणमुक्त दिवाळीला पाठ दाखविलीण्याकडेच जनतेचा कल राहिला.

सर्वत्र फटाक्यांचा अवाज व प्रदूषण असताना येथील पर्यावरण प्रेमी शिक्षिकेने दिवाळीत प्रत्येक घटीला रोपे लावून ..रोपे भेट देऊन दिवाळी

साजरी केली. या शिक्षिकेची पर्यावरण

पूरक हरीत दिवाळी सर्वांना भावली.

ही हरित दिवाळी प्रेरणादायी ठरली.

        पर्यवान सखी म्हणून परिचित असलेल्या नवभारत विद्यालयातील शिक्षीका वर्षा भांडारकर यांनी संपूर्ण दिवाळीच्या सुट्टीत विविध

प्रजातीच्या रोपांचे रोपन केले व रोप वाटप करुन सुट्टीचा सदुपयोग केला.

 दिवाळीच्या सुट्टीत दिवाळी सणाची तयारी, सोबतच रोज एक नवीन हरित उपक्रम करून संपूर्ण सुट्टी घालवली,

आनंद उपभोगला व साऱ्यांना आनंदीत केले आहे यातून दिवाळी निमित्त पर्यावरण पूरक संदेश,.योग समुहात रोप वाटपातून फटाके मुक्त दिवाळी ची मानसिकता वाढविली. संदेश व तुळस रोप वाटप.

बालकदिनानिमित्य लहान बालकांना खाऊ,पेन सह रोपांचे वाटप केले.

काही गरजुंना कपडे ध विवीध रोपांचे वाटप केले.

 संपुणं दिवाळी दरम्यान टाकाऊ प्लाॅस्टिकग्लास व बॅग मध्ये रोपांचे रोपन व कुंडीमध्ये पाम च्या रोपांचे रोपनकेले कार्तिक एकादशी निमित्त कुंडीत शुद्ध वातावरण ठेवणारे तुळस रोप,स्नेक प्लान्ट चे रोपन केले व वाटले.

8.पर्यावरण कार्य करणाऱ्या सखींची भेट घेऊन रोपटे देऊन त्यांचं कौतुक केले. दिवाळी काळात बारश्याच्या कार्यक्रमांमध्ये तुळस रोपे भेट देऊन शुभेच्छा दिल्यात.परिवारातील भाऊ व वहिनीना रोपे भेट देऊन भाऊबीज साजरी केली.यातून पर्यावरणाची जाण जागावी, आरोग्य मय जीवन जगावे हा संदेश पसरतो आहे.

आज या एका शिक्षीकेने संपुर्ण दिवाळीत दिलेला हरीत दिवाळीचा संदेश नक्कीच प्रेरणा देणारा ठरला आहे. कौतुकास्पद आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये