ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा-युवती सेनेतर्फे वरोरा विधानसभा क्षेत्रात  ‘संविधान वाचन कार्यक्रमाचे आयोजन’

संविधान दिनाचे औचित्य; विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा-युवती सेनेतर्फे वरोरा विधानसभा क्षेत्रात संविधान दिनाचे औचित्य साधून दिनांक २५ व २६ नोव्हेंबरला ‘संविधान वाचन कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना युवा नेते, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना व युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई, युवा सेना कार्यकारी सदस्य हर्षल काकडे, शीतल देवरुखकर-सेठ, युवा सेना पूर्व विदर्भ सचिव तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांचे मार्गदर्शनात व वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे,सौ नर्मदा बोरेकर चंद्रपुर जिल्हा महीला सघंटीका ,भास्कर ताजने उपजिल्हा प्रमुख,दत्ता बोरेकर वरोरा तालुका प्रमुख, नरेद्र पंढाल भद्रावती तालुका प्रमुख, खेमराज कुरेकार वरोरा शहरप्रमुख व घनश्याम आस्वले भद्रावती शहर प्रमुख यांचे नेतृत्वात सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

सार्वभौम भारत देशाचे संविधान हे संविधान सभेद्वारा दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ ला स्वीकारल्या गेले. त्यानंतर २६ जानेवारी १९५० ला संपूर्ण देशात संविधान प्रत्यक्षरीत्या लागू झाले. या दोन्ही घटना भारत देशाकरीता ऐतिहासिक आहे. भारत देशाचे संविधान हे एकमेवाद्वितीय असे संविधान आहे. या संविधानाद्वारे समस्त भारतीय जनतेला स्वातंत्र्य, अहिंसा व बंधुता या त्रयसुत्रिने बांधून एकसमान हक्क व अधिकार बहाल केले आहेत. या दिवसाचे स्मरण ठेवून व भारतीय लोकशाही अबाधित रहावी, या हेतूने २६ नोव्हेंबरला शासकिय कार्यालय, सार्वजनिक संस्था, शाळा, महाविद्यालय, प्रतिष्ठान व घरोघरी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व्हावे, यासाठी वरोरा विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक संस्थांनी तथा प्रत्येक नागरिकाने या उद्देशिकेचे वाचन करावे, असे जाहीर आवाहन युवा- युवती सेना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आले आहे.

समस्त नागरिकांनी दिनांक २५ व २६ नोव्हेंबर रोजी साजरा होत असलेल्या संविधान वाचन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, कु. प्रतिभा माडंवकर युवती सेना जिल्हा अधिकारी, मनिष जेठाणी युवा सेना जिल्हा अधिकारी, येशु आरगी युवासेना जिल्हा सरचिटणीस,शरद पुरी युवायेनी उपजिल्हा अधिकारी,कु.शिव गुडमल युवतीसेना उपजिल्हा अधिकारी,अभिजीत कुडे वरोरा -भद्रावती विधानसभा युवसेना अधिकारी,उमेश काकडे युवासेना चिटणीस युवसेना अधिकारी,विक्की तावाडे वरोरा तालुका युवासेना अधिकारी, राहुल मालेकर भद्रावती तालुका युवासेना अधिकारी,प्रज्वल जानवे वरोरा शहर युवा अधिकारी,मनोज पापडे भद्रावती शहर अधिकारी यांनी असे आवाहन आहे केले सदर माहीती  गोपाल सातपुते प्रसिध्दी प्रमुख युवासेना यांनी प्रसिध्दीस दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये