कर्नाटक एमटाच्या ओव्हरलोड व अनधिकृत गाड्यांवर कारवाई करा – आपचा इशारा
कर्नाटक एमटा मुळे तालुक्याला प्रदूषणाचा फटका : सुमित हस्तक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आम आदमी पार्टी भद्रावतीच्या शिष्टमंडळांनी दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी परिवहन विभाग चंद्रपूर यांची भेट घेतली. कर्नाटका एमटा भद्रावती मध्ये प्रायव्हेट गाड्या या बिना परमिट ने चालत आहे. जेव्हा की कायद्याप्रमाणे कोणत्याही कंपनी किंवा खदानी मध्ये फक्त परमिट गाड्या चालू शकतात. हे प्रकार वर्षानुवर्ष चालत आहे आणि हे कायद्याचे उल्लंघन सुरू आहे.
ट्रकांमध्ये ओवरलोड कोळसा भद्रावती ते चंद्रपूर आणि भद्रावती ते माजरी मार्ग चालत असल्यामुळे रोडची पण दुर्दशा होत आहे. ओव्हरलोड ट्रकांमुळे कोळसा भरभरून जात असल्यामुळे प्रदूषण प्रमाण सुद्धा या भागात वाढत असुन सर्वसामान्य नागरिकांना हे त्रास सोसावे लागत आहे. तरी या विषयावर चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी असा इशारा भद्रावती शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदना द्वारे केली आहे.
यावेळी आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरज शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, ऍड. तब्बसूम शेख, आप नेते शंकरजी सरदार, जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुरेकर, दिपक जी बारशेट्टीवार, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, आप नेते अतुल भाऊ भैसारे, निखिल भाऊ जट्टलवार, वसीम भाई कुरेशी, सॅम्युअल गंधम, नितीन बावणे, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, नयनाताई गंधम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, सुरज पुल्लरवार, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे उपस्तीथ होते.