ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुरोगामी शिक्षक समिती संघटना करणार आंदोलन

प्रलंबित समस्यांमुळे शिक्षक झाले त्रस्त

चांदा ब्लास्ट

         संघटनेने वारंवार विनंतीपर निवेदन देऊनही जिल्हा परिषद चंद्रपूर येथील प्राथमिक शिक्षकांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यासंदर्भात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटनेने वारंवार पाठपुरावा केला असता कोणताही सकारात्मक परिणाम दिसून येत नसल्याने त्रस्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुरोगामी शिक्षक संघटना आंदोलन करणार असल्याचे पत्र जिल्हा परिषद चंद्रपूरला दिले आहे.

              सेवानिवृत्त होऊनही शिक्षक मिळणाऱ्या लाभापासून वंचित असून जिल्हा परिषदेतून कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याचे संघटनेचे म्हणणे असून,कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीतील तफावत, एकस्तर वेतनश्रेणी बाबतीत कोर्ट निर्णयानुसार कार्यवाही, अवघड क्षेत्रातील तिसऱ्या टप्प्यातील शिक्षक समुपदेशनबाबत न्याय, एकस्तरनुसार वेतननिश्चिती, शिक्षणअहर्ता वाढीची परवानगी देण्याचे अधिकार पंचायत समितीला देणे, वेतनाच्या एक्सेल शीट व प्रमाणपत्रबाबतीत अनियमितता, वैद्यकीय प्रतिपूर्ती, सेवापुस्तक पडताळणी,स्थायी आदेश, वरिष्ठ वेतनश्रेणी, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती, पुरस्कारप्राप्त शिक्षकांना वेतनवाढ, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, आयकर कपात फिलिंग करणे, निर्लेखीत वर्गखोल्या, संघटनेच्या तालुका स्तरावर अनियमित सहविचार सभा, आदिवासी प्रोत्साहन भत्ता यासह कित्येक समस्या प्रलंबित असून त्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या असे निवेदन देत पुरोगामी शिक्षक समिती संघटना चंद्रपूरचे राज्यनेते विजय भोगेकर, राज्यसरचिटनिस हरीश ससनकर, महिलाअध्यक्ष अलका ठाकरे,अध्यक्ष किशोर आनंदवार, सरचिटणीस सुरेश गिलोरकर, कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, कोष्यध्यक्ष सुनील कोहपरे ,महिलामंच अध्यक्ष विद्या खटी, सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे,कार्याध्यक्ष सिंधू गोवर्धन, कोष्यध्यक्ष लता मडावी,उपाध्यक्ष रवी सोयाम, मोरेश्वर बोंडे, विलास मोरे, जीवन भोयर, लोमेश येलमुले, नरेश बोरीकर तसेच जिल्हा कार्यकारिणी यांनी आंदोलनाची भूमिका घेतली असल्याचे प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये