आष्टा येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चॅलेंजर क्रिकेट क्लब आष्टा तर्फे विदर्भ स्तरीय भव्य हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट सामने भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टा येथे पार पडले.
त्यावेळी सामन्यात जिंकलेल्या चमुला बक्षीस वितरण करण्यासाठी शिवसेना (उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, प्रमुख पाहुणे म्हणून तर शिवसेना माजी तालुका प्रमुख रमेश पडवे, शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात आले.
त्यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शेंडे साहेब, कालमेंघे प्रमोद खिरटकर, गजानन टोंगे,सोहेल अली उपस्थित होते.
कार्यक्रमाला सहकार्य अतुल पडवे, अजय भाकरे यांनी केले. तसेच शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले यांनी समस्त क्रिकेट प्रेमिना मार्गदर्शन केले. यावेळी समस्त क्रिकेटर, ग्रामवासी, युवक, शिवभक्त उपस्थित होते.