Subhash Dhote MLA
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रियंका गायकवाड हीची युवा संसदेच्या क्रिडा मंत्री पदी निवड

नेहरू युवा केंद्र व युनिसेफच्या युवा संसदेमध्ये राज्यपालाच्या उपस्थितीमध्ये करणार चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

नुकत्याच संपन्न झालेल्या युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अभिरुप युवा संसद राज्यस्तरीय उपक्रम युवकांन साठी राबविल्या जात आहेत. याकरिता ३६ जिल्ह्यातुन ७२ संसद प्रतिनिधी येणार आहे.त्यापैकी २४ प्रतिनिधी हे मंत्रिमंडळ कार्य पाहणार असुन उर्वरित संसद सदस्य म्हणून कार्य पाहणार आहेत. यामध्ये ग्रामिण भागातिल चंद्रपूर जिल्ह्यातील चंदनखेडा ला लागुनच असलेल्या शेगांव (खु) येथील सामाजिक कार्यात सद्यव अग्रेसर असलेली गोरगरीब व तरुण युवक, युवतींच्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी लढणारी कुमारी प्रियंका पांडुरंग गायकवाड हीची युवा संसद लोकसभेच्या क्रिडा मंत्री पदी निवड झाली.-तर येत्या १९ व २० नोव्हेंबर ला. राज्याचे राज्यपाल महोदय रमेश बैस यांच्या उपस्थितीतीमध्ये व नेहरू युवा केंद्र संघटन, महाराष्ट्र – गोवा राज्य निर्देशक प्रकाश मनुरे व युनिसेफ महाराष्ट्र समन्वयक यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत.राज्यातिल अभिरुप युवा संसद ही राजधानी मुंबई येथील विद्यापीठ कॅम्पस कलीना कॅम्पस सांताक्लूज येथे संपन्न होणार आहे. २ दोन दिवस चालणाऱ्या या संसदेत विधिमंडळ राज्यभवन, विधानभवन, आणि मंत्रालयाच्या भेटिसुद्धा या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत. युवा संसद युवकांच्या माध्यमातून चालविली जाणार आहे.तर प्रियंका पांडुरंग गायकवाड हीची क्रिडा मंत्री पदी निवड झाल्याने नेहरू युवा केंद्र चंद्रपूर युवा अधिकारी समशेर सुभेदार, समाजपरिवर्तक विठ्ठलजी हनवते, सरपंच मोहित लभाने शेगांव खु, स्वाती नन्नावरे पोलिस पाटील शेगांव खु, तं.मु स.अध्यक्ष शेखर भिवदरे, ग्रामसेवक शिरपुरकर, तं.मु.स.अध्यक्ष चंदनखेडा मनोहर हनवते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिलजी चौधरी,किंग राॅयल ग्रुप चे अध्यक्ष मयुर गायकवाड, उपाध्यक्ष ब्रिजेश जिवतोडे, शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा. या निवडीचे श्रेय तिने नेहरु युवा केंद्राचे माजी तालुका समन्वयक आशिष सुरेश हनवते चंदनखेडा. यांच्यासह आई- वडिल नातेवाईक मित्रमंडळी, बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट चंदनखेडा, विरांगणा मुक्ताई क्रिडा मंडळ चरुर (धा). आदिवासी संघटन संघटन महाराष्ट्र.यांच्याकडुन सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये