ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती 19 नोव्हेंबर साजरी करण्यात आली .या प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ स्मिता चिताडे होत्या प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री धनंजय पाटील गोरे, उप मुख्याध्यापक अनील काकडे, पर्यवेक्षक शंकर तुराणकर उपस्थित होते.

सर्वप्रथम इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्वेतलाना टिपले यांनी केले याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये