ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आधुनिक भारताचा निर्मितीत श्रीमती इंदिराजी गांधी यांचे मोठे योगदान

सर्वात प्रभावशाली पंतप्रंधानामध्ये इंदिराजींचे कार्य देशासाठी फार मोलाचे - विजय मुत्यालवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

     स्वतंत्र भारत देशाच्या पहिल्या कणखर आणि कार्यक्षम महिला पंतप्रधान,आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्वाचे योगदान असणाऱ्या,आयर्न लेडी स्व.श्रीमती इंदिरा गांधीजी यांच्या जयंती निमित्त अभिवादन पर कार्यक्रम मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार जनसंपर्क तथा तालुका काँग्रेस पक्ष कार्यालय सावली येथे पार पडला याप्रसंगी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पित करून अभिवादन करण्यात आले.

इंदिरा गांधींचा इतिहास कदाचित जगातील सर्वात लोकप्रिय भारतीय नेत्यांपैकी एक आहे. देशाच्या संस्थापकांपैकी एक, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या असण्याव्यतिरिक्त त्या भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर, तिच्या मजबूत उपस्थितीमुळे भारताचे स्थान उदयोन्मुख जागतिक महासत्ता म्हणून विकसित करण्यात मदत झाली. त्यांचा कार्यकाळात इंदिराजींना अनेकांनी ‘द आयर्न लेडी ऑफ इंडिया’ म्हणून त्यांचे संबोधन केले आहे आज त्यांना सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन करण्यात आले

शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार, शहर अध्यक्ष अमर कोनपत्तीवार,प्रशांतजी राईंचवार,भोगेश्वर मोहुर्ले,शहर महिला अध्यक्षा भारती चौधरी,साधनाताई वाढई,नगरसेवक सचिन सांगिडवार,सौ.कविता मुत्यालवार कमलेश गेडाम,आशिष मुत्यालवार,सुनील ढोले, यश गेडाम आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये