Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोथली येथील कॅन्सरग्रस्त रुग्णास आर्थिक मदत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

      विरोधी पक्षनेते,माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडे्ट्टीवार यांच्यातर्फे मौजा.बोथली वार्ड क्रमांक ०२ येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण रुक्माबाई गिरमा नरेड्डीवार वय ५८ वर्ष व वार्ड क्रमांक ०१ मधील पुष्पाबाई रामाजी शिंदे वय ५० वर्ष यांना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे व सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील गड्डमवार व उपसरपंच विजय पाटील गड्डमवार पत्रकार प्रा.शेखर प्यारमवार यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.

       सविस्तर वृत्त असे की, रुक्माबाई गिरमा नरेड्डीवार ह्या मागील काही दिवसापासून आजारी असल्यामुळे उपचार घेत होत्या. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे स्पष्ट केले, तसेच पुष्पाबाई शिंदे यांच्या गर्भ पिशवीच्या शत्रक्रियेसाठी घरातील आर्थिक स्थिती बिकट असल्याने पुढील उपचारासाठी आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांना मिळाली.त्यांनी तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांना संपर्क करून रुक्माबाई गिरमा नरेड्डीवार आणि पुष्पाबाई शिंदे यांना आर्थिक मदत मिळवून दिली.

       आर्थिक मदत देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे,बोथलीचे उपसरपंच व जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता विजय पाटील गड्डमवार,सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील गड्डमवार, पत्रकार प्रा.शेखर प्यारमवार,अमोल मुप्पावार बोथली येथील काँग्रेस कार्यकर्ते राजू मुप्पावार,विशाल मुस्कावार, रवी कन्नाके तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये