ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाऔष्णिक विद्युत केंद्रात ‘दिवाळी पहाट २०२३’

सर्व रसिक श्रोत्यांनी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचा भरभरुन घेतला आनंद

चांदा ब्लास्ट

दि. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळीचे औचित्य साधुन चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्रात उर्जानगर येथील अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकरिता मुख्य अभियंता निवास येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अंधाराकडुन उजेडाकडे नेणारा तसेच सर्व नाती उद्धिंगत करणारा दिवाळी हा सगळ्यात मोठा सण आहे. या सणा निमित्य सर्व अधिकारी-कर्मचारी यांना एकत्र आणुन आपण दिवाळी हा सण कसा साजरा करु शकतो त्याकरिता या दिवाळी पहाटचे आयोजन केले. सकाळी ६.०० वाजता सुरु झालेल्या या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाची गोडी वाढवली ते नागपुर येथील ऋतुराज गृपच्या सुमधुर गीतांनी आणि त्यात अजुन भर म्हणजे उर्जानगर मधील रसिक श्रोते. एकाहुन एक जुन्या मराठी-हिंदी गितांसह पारंपारिक शास्त्रिय संगीताची सुद्धा जोड जणु संगीताची मेजवानीच. पहाटेची थंडी व उगवत्या सुर्याच्या साक्षीने या सुंदर वातावरणात मनाला मोहुन टाकणाऱ्या सुमधुर गाण्यांनी अजुन भर टाकली. सर्व रसिक श्रोत्यांनी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचा भरभरुन आनंद घेतला.

दिवाळी पहाटच्याया कार्यक्रमास चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार तसेच उपमुख्य अभियंता श्याम राठोड, विराज चौधरी, डॉ. भुषण शिंदे, अनिल पुनसे, महेश राजुरकर, महाव्यवस्थापक (वित्त) बाहुबली डोडल, कल्याण अधिकारी दिलिप वंजारी व इतर अधिकरी-कर्मचारी वर्ग त्यांच्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. कल्याण अधिकारी दिलिप वंजारी यांनी दिवाळी पहाट सादर करणाऱ्या ऋतुराज गृप आणि कार्यक्रमास उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले.

उर्जानगर मध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम अधुन मधुन व्हायला पाहिजेत व असे खेळीमेळीचे वातावरण

निर्माण होण्यास यामुळे मदत होते असे मत मुख्य अभियंता यांनी व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये