ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस व जयंती साजरी

सर्व समाज बांधव व विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्य फराळ देऊन कार्यक्रमाची सांगता..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             ब्रिटिशांच्या जुलमी व अन्यायकारक राजवटी विरुद्ध उठाव करून संपूर्ण मुंडा समुदायात व भारतीय जनतेत अधिकार व स्वाभिमानाचा वणवा पेटवून ब्रिटिशांच्या आदिवासींचे इसाईकरणं व भूमिपुत्रांचे विस्थापिकरन धोरणाला आव्हान देणारे बिरसा मुंडा खऱ्या अर्थाने आदिम जमातीचे भगवान होते.असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष गोंडी समाजाचे कार्यकर्ते बंडूजी परचाके यांनी व्यक्त केले.

तसेच शिक्षणातूनच समाज विकसित होईल असे विचार समाज बांधव अरुण येरकाडे यांनी व्यक्त केले. समाज स्थानिक गवराळा वॉर्ड येथील जय जगन्नाथ सेवानिवृत्त मित्र मंडळ येथे आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. या प्रसंगी व्यासपीठावर नीलकंठ आत्राम, पांडुरंग कोयचाडे, सूर्यभान परचाके व जेष्ठ नागरिक बबन जीवतोडे,श्यामराव खापणे महादेव उरकुडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिमेश माणुसमारे यांनी तर प्रस्ताविक राजेंद्र राजूरकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दिनकर घाटे महादेव डोंगे, प्रभाकर निमकर, देवराव सातपुते, विलास खापणे, सुखदेव पत्रकार अशोक बुच्चे,उमेश उरकुडे,भाऊराव पोहिंनकर तसेच सर्व जगन्नाथ भक्तांनी सहकार्य केले.आभार प्रदर्शन विनोद सावंनकर यांनी केले.प्रसंगी उपस्थित सर्व समाज बांधव व विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्य फराळ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये