ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामपंचायत हद्दीतील वेकोली प्रशासन टॅक्स देत नसल्याने ग्रामविकासाला अडथळा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत हद्दीतील वेकोली प्रशासन टॅक्स देत नसल्याने ग्रामविकासाला अडथळा निर्माण होत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे यांनी राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांना पत्र लिहून संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

चोखारे यांनी पत्रात म्हटले आहे की, ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या वेकोली प्रशासनाने मागील अनेक वर्षांपासून टॅक्स भरला नाही. तसेच वेकोलिच्या वसाहती सुद्धा टॅक्स देत नसल्याने ग्रामविकासासाठी येणारा कराचा निधी कमी होत आहे. यामुळे गावातील रस्ते बांधकाम, रस्त्यांची दुरुस्ती, दिवाबत्तीची सोय करणे इत्यादी कामे प्रभावित होत आहेत.

चोखारे यांनी याबाबत योग्य ती दाखल घेऊन चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील वेकोली प्रशासन टॅक्स हा ग्रामपंचायतीला देण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे.

राज्य सरकार या विनंतीचा विचार करून संबंधितांवर कारवाई करेल अशी आशा आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये