Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे ‘स्पोर्ट फिएस्टा 2के23’ चा समारोप

चांदा ब्लास्ट

विद्यार्थी दशेत खेळ महत्त्वाचे आहे. खेळांमुळे शारीरिक व्यायामासोबतच बौध्दिक विकासालाही हातभार लागतो. हाच उद्देश समोर ठेवून दि. 03/11/2023 ला सुरूवात झालेल्या पाचदिवसीय क्रीडा महोत्सवाचा समारोप दि. 07/11/2023 ला करण्यात आला.

क्रीडा महोत्सवातंर्गत आचार्य चाणक्य, महर्षी चरक, महर्षी पाणीनी, महर्षी वेदव्यास या चार हाऊसच्या विद्यार्थ्यांमध्ये वैविध्यपूर्ण क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. दि. 03/11/2023 ते 07/11/2023 दरम्यान विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार विविध प्रदर्शनीय सामने पार पाडले. त्यामध्ये रनिंग रेस, लेमन अॅन्ड स्पून, कोन बॉल बॅलेंसिंग, व्हॉलीबॉल, फुटबॉल, आट्यापाट्या, टग ऑफ वॉर, स्लो सायकलिंग, खो-खो, डॉच बॉल, रिलेरेस, पॅराशूट गेम, सॅक रेस इ. खेळांचे आयोजन केल्या गेले. यामध्ये वर्ग 1 ते 10 च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

विजयी स्पर्धकांना प्रशस्ती प्रमाणपत्र व सुवर्ण, रौप्य व कास्य असे तीन प्रकारचे पदक वितरित करण्यात आले तसेच क्रीडा महोत्सवातंर्गत बेस्ट कॅबिनेट इयत्ता 9 वी चा विद्यार्थी मिथीलेश मंगेश देशपांडे, बेस्ट टीम इन्चार्ज शिक्षिका मनिषा चिवंडे, बेस्ट होऊसमास्टर शिक्षक संघपाल भसारकर, बेस्ट प्लेयर इयत्ता 6वी ची विद्यार्थीनी सखी पांडूरंग दोरखंडे, बेस्ट हाऊस महर्षी वेदव्यास करीता शिक्षीका जास्मीन हकीम यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

क्रीडा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी विद्यार्थी दशेतील खेळाचे महत्त्व समजावून उत्तम खेळाडू कसे व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सर्वांगीण विकास करणे आवश्यक आहे कारण अभ्यासासह विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढीस लागावे हाच शालेय शिक्षणाचा खरा उद्देश असतो.

विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना विकसित होण्यासाठी अशा आयोजनाचा मोठा हातभार लागतो. असे प्रतिपादन प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी केले तर पाच दिवसीय नियोजनबद्ध क्रीडा महोत्सवाच्या आयोजक समितीचे सर्व क्रीडा शिक्षकांचे व शाळेला नेहमीच पाठींबा देणा-या तसेच आपल्या मुलांना खेळात सहभागी करण्यास प्रेरीत करणा-या पालकांचे त्यांनी अभिनंदन केले.

पाच दिवसिय क्रीडा महोत्सव प्रमुख महेश गौरकार तसेच क्रीडा शिक्षक विनोद निखाडे, अमर कडपेवाले, रमेश कोडारी, जयंती मड्डेला, प्रणोती चौधरी यांच्या अथक परिश्रमामुळे ‘स्पोर्ट फिएस्टा 2के23’ (Sports Fiesta 2K23) यशस्वीरित्या संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये