Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेनेची घोडदौड

जिल्ह्यातील भद्रावती व वरोरा नगरपरिषदेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एकछत्री प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सरचिटणीस श्री वेदांत तालन यांच्या पुढाकारणे शिवसेना शहरप्रमुख आशिष ठाकरे व शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल केने यांच्या प्रमुख उपस्थितीत भद्रावती येथील शासकीय विश्राम गृह येथे भद्रावती व वरोरा नगरपरिषदेतील सर्व कंत्राटी कर्मचारी वर्गाचा पक्ष प्रवेश करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी कर्मचारी वर्गावर सातत्याने अन्याय होत आलेला असून आता त्यांना न्याय देण्याची ग्वाही श्री वेदांत तालन यांनी दिली असून तात्काळ मुख्याधिकारी सौ. विशाखा शेळकी न. प. भद्रावती यांना कार्यालयात गाठून जाब विचारत सर्व समस्या निकाली काठन्याच्या सूचना देण्यात आल्या.

             कर्मचारी वर्गाच्या बाजूने सातत्याने शिवसेना उभी राहिली आहे. त्यांच्या न्यायहक्कासाठीच तर शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेनेची स्थापना झालेली आहे. किरण पावसकर यांच्या मार्गदर्शनात संघटनेची घोडदौड अटकेपार सुरु असून भगवा झेंडा रोवन्याचा चंगच जणू शिवसैनिकांनी बांधला आहे. याचीच प्रचिती स्वरूपात विदर्भात आपल्या संघटनेचे पाय घट्ट रोवण्यास शिवसैनिक कटीबद्ध झाला आहे. भविष्यात विदर्भातील सर्व नगरपरिषदेत राष्ट्रीय कर्मचारी सेनेचेच सदस्य वा शिवसैनिक दिसतील असे संबोधन शिवसेना शहरप्रमुख आशिष ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले. कार्यक्रमाची सांगता शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिलजी केने यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.

याप्रसंगी कामगारसेनेचे सरचिटणीस सर्वश्री वेदांत तालन,प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शिवसेना शहरप्रमुख आशिष ठाकरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील केने आणि कर्मचारी वर्गातून राजेश चव्हाण, संदीप चटपकार, जितू चव्हाण, प्रितेश दोडके, राजहंस रामटेक,अजय सोनुले, विनोद नागोसे, लक्ष्मण शिवरकर, संजय देरकर, अक्षय शिरगिरवार, प्रफुल काळे, अजय खांदारे, दिलीप पचारे, सागर शिवरकर इत्यादी कंत्राटी कर्मचारी वर्ग शेकडोंच्या संख्येने उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये