ताज्या घडामोडी

भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे, श्रीपाद कोलते

पावरग्रिड व एन.सी.सी. चा उपक्रम

चांदा ब्लास्ट :अविनाश नागदेवते (प्रतिनिधी )

देवळी : ‘देशाची खरी ताकद तेथील नागरिकच असतात. देश मजबूत बनवायचा असेल तर भ्रष्टाचार मुक्त समाज असला पाहीजे. याकरीता चांगली मूल्ये शाळा-महाविदयालयीन जीवनातच रूजवली गेली पाहीजेत. म्हणजे सुजान नागरिक तयार होतील.

खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याची मानसिकता तयार झाली पाहीजे, असे प्रतिपादन स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील एन.सी.सी. सभागृहात आयोजित पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी पावरग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे सहाय्यक मुख्य प्रबंधक श्रीपाद कोलते यांनी 4 नोव्हेंबर रोजी केले.

21 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियन अंतर्गत एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील एन.सी.सी.युनिट व पावरग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सतर्कता जागरूकता सप्ताहा’ निमित्त ‘सुजाण नागरीकच भ्रष्टाचार मुक्त भारत बनवू शकतात’ या विषयावर वादविवाद व ‘भ्रष्टाचार थांबवा’ विषयावर ‘पोस्टर मेकिंग’ स्पर्धेचे आयोजन स्थानिक एस.एस.एन.जे. महाविद्यालयात करण्यात आले होते. यात 40 एन.सी.सी.छात्र सैनिक, रोव्हर्स व रेंजर्सनी भाग घेतला.

पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी पावरग्रिड चे सहाय्यक मुख्य प्रबंधक श्रीपाद कोलते तर प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवी इमरान राही, राजू लभाने, प्रा. मेघा फासगे, प्रा. जगदीश यावले, ज्यूनिअर इंजिनिअर कौसल कुमार व एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.

‘पोस्टर मेकिंग स्पर्धेत लक्ष्मी सहारे, आकाश कन्नाके व अपेक्षा नेवारे यांना प्रथम, द्वितीय व तृतीय तर पायल चौके व वैष्णवी शिरभाते यांना प्रोत्साहनपर पुरस्कार तसेच वक्तृत्व स्पर्धेत सार्जंट वैष्णवी शिरभाते, कॅडेट कोमल शितळे व कॅडेट आश्विनी परचाके यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार तर रूचिका कांबळे व कॅडेट चौके यांनी प्रोत्साहनपर पुरस्कार मिळवला

या प्रसंगी बोलताना इमरान राही म्हणाले तरूण मनावर भ्रष्टाचार मुक्त समाज निर्मितीचे स्वप्न बिंबविल्यास नवा भारत निर्माण होवू शकतो. या करीता त्यांच्या दैनंदिन जीवनात थोर देशभक्तांचे कार्य सातत्याने समोर ठेवले पाहिजे तर कॅप्टन मोहन गुजरकर म्हणाले एन.सी.सी. च्या प्रशिक्षणातून ‘देश प्रथम’ ही भावना तरूणांमध्ये रूजविली जाते. याच भावनेतून ‘भ्रष्टाचार मुक्त समाज’ तयार करता येईल.

पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे संचालन सार्जंट प्रशिल अंदुरकर व आदित्य तामगाडगे यांनी तर आभार सिनिअर अंडर ऑफिसर शेखर भोगेकर याने मानले.

यशस्वीतेकरीता अंडर ऑफिसर राकी खोडे, अक्षय जबडे, नयना गवळी, सौरभ साव व एन.सी.सी.छात्र सैनिकांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाची सांगता ‘हम सब भारतीय है…. या एन.सी.सी. गीताने झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये