ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवमतदार नोंदणी अंतर्गत विशेष अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक 05 नोव्हेंबर 2023 रोजी 47 वर्धा विभानसभा मतदार संघा मध्ये मा. जिल्हाधिकारी वर्धा यांचे निर्देशानुसार नवमतदार नोंदणी विशेष अभियाना अंतर्गत स्वस्त धान्य दुकानदारामार्फत मतदान नोंदणी कार्यक्रमाची प्रसिध्दी देण्यात आली. 47 वर्धा मतदार संघ अंतर्गत वर्धा तालुक्यातील 74 रास्तभाव दुकान व सेलु तालुक्यातील 73 रास्तभाव दुकानदारांचा समावेश आहे. वर्धा तालुक्यातील 42500 शिधापत्रीकाधारक व सेलु तालुक्यातील एकुण 22500 शिधापत्रीकाधारक असुन त्यांच्या शिधापत्रीकावर नव मतदार नोंदणी व आगामी काळात होऊ घातलेल्या सार्वत्रीक निवडणुकामध्ये सर्व मतदारांनी मतदानाचा हक्काची जानजागृती करणारे स्टिकर शिधापत्रीकेवर लावण्याची मोहीम सुरु करण्यात आली.

येत्या आठवडयाभ- यामध्ये सर्व शिधापत्रीकाधारकांच्या शिधापत्रीकेवर विशेष अभियानाचे स्टिकर लावण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. अशा प्रकारे 47 वर्धा विधानसभा मतदार संघातील एकुण 65000 कुटुंबापर्यंत नवमतदार नोंदणी व मतदानाचा हक्क बजाण्यासाठी नागरीकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न स्वस्तधान्य दुकानदारमार्फत करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाची सुरुवात आज दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात आली. 47 वर्धा विधानसभा मतदार संघा अंतर्गत सर्व नागरीकांना शासनाच्या वतिने आव्हान करण्यात येते की त्यांनी आपल्या कुटुंबातील नव मतदारांची नोंदणी करुन घ्यावी तसेच कुटुंबातील मय्यत व्यक्तीची नावे नमुना 7 भरुन वगळणी करुन घ्यावी. सदर कामाकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची मदत घेण्याचे आव्हान मतदान नोंदणी अधिकारी यांचे मार्फत करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी मतदार नोंदणी अधिकारी, श्री. दिपक कारंडे तसेच उपजिल्हा निवडणुक अधिकारी, श्री. अनिल गावित, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. एस. बी. भराडी, तहसिलदार श्री रमेश कोळपे, निरीक्षण अधिकारी श्री प्रज्वल पाथरे, पुरवठा निरीक्षक श्री. महेश थेरे आदि उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये