ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भोयगाव मार्गावर दोन ट्रकमध्ये भिषण अपघात

एका चालकाचा जागीच मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीत गडचांदूर-भोयगाव मार्गावर ३नोव्हेंबर रोजी रात्री अंदाजे ८ च्या सुमारास एक हृदयविदारक घटना समोर आली आहे. बाखर्डी गावाजवळ दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रकला आग लागून त्यात होरपळून एका चालकाचा जागीच अक्षरशः कोळसा झाला.

       प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील सावंगी येथील ट्रक चालक हायवा ट्रक क्रमांक MH 34 AV 0844 रात्रीच्या सुमारास गडचांदूर वरून भोयगावकडे जात होता. बाखर्डी गावाजवळ एका चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याने विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 34 AV 2262च्या डिझेल टँकवर जोरात जाऊन धडकला आणि क्षणभरात डिझेल टँकचा विस्फोट होऊन हायवा ट्रकला आग लागली. धडक दिलेला चालक वाहनात अडकल्याने त्याला बाहेर पडणे शक्य न झाल्याने त्याचा आगीत जागीच कोळसा झाला.

रामा धर्मा टेकाम (40) रा. सावंगी ता. वणी, जि. यवतमाळ असे मृतक चालकाचे नाव आहे तर रामेश्वर बालाजी माळगे रा. गडचांदूर वार्ड क्रमांक 4 लगेच बाहेर पडल्याने सुदैवाने तो वाचला. आग ऐवढी भीषण होती की, जळत असलेल्या चालकाला वाचवता आले नाही. परिणामी त्याचा जागीच अक्षरशः कोळसा झाला. सदर घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस टीम व नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील बोरीकर पुढील तपास करीत आहे. सदर घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

       अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून यामध्ये काही ट्रान्सपोर्ट कंपनीचे वाहन चालक भरधाव

वेगाने वाहन चालवताना एका हातात वाहनाचे स्टेअरिंग तर

दुसऱ्या हातात कानाला मोबाईल लाऊन वाहने चालवत असल्याचे आढळतात. ठाणेदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी गांभीर्याने घेत आपल्या परिक्षेत्रातील समस्त ट्रान्सपोर्टरांची बैठक घेऊन यावर

कडक निर्बंध लादण्याची मागणी काही सुज्ज्ञ नागरिकांनी केली आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये