चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला सन्मान मिळवून देण्यासाठी झटणार

प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची ग्वाही

चांदा ब्लास्ट

विपरीत परिस्थितीतही राज्यात काँग्रेस पक्ष संघटना जिवंत ठेवण्यासाठी कष्ट घेणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याचा पक्षात सन्मान राखला जाईल. या कार्यकर्त्यांच्या बळावरच आम्ही पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत नंबर एक वर राहू असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केला. मुंबई येथील टिळक भवनात आयोजित सत्कार सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
मा. न्यायालयाचे आदेशामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे नेतृत्वात पक्षाने आघाडी घेत मोठे यश संपादन केले. त्याचप्रमाणे नानाभाऊ विधान सभेचे अध्यक्ष असताना प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे तत्कालीन अध्यक्ष श्री प्रमोद मोरे यांचे नेतृत्वात राज्यातील पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी श्री पटोले यांची भेट घेऊन ओबीसी समाजाचे प्रश्न त्यांचेकडे मांडले. यातूनच नानाभाऊंच्या पुढाकाराने ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी करणारा ठराव विधानसभेत मांडण्यात आला व संमत करून केंद्राकडे पाठविण्यात आला होता. कृतज्ञतेच्या भावनेतून श्री मोरे यांच्या राज्यभरातील प्रमुख सहकाऱ्यांनी हा सत्कार सोहळा घडवून आणला. यावेळी त्यांना मानाचा फेटा व तलवार भेट देण्यात आली
सदर प्रसंगी मंचावर अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आशिष दुआ, सोनल पटेल, जेष्ठ नेते शाम पांडे, मोहन जोशी, हुसेन दलवाई प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त कार्यालयीन सरचिटणीस श्री प्रमोदजी मोरे आणि श्री देवानंद पवार यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
श्री. प्रमोद मोरे आणि श्री. देवानंद पवार यांची प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयीन सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमोद मोरे यांचे सहकारी राजीव घुटे, रविंद्र परटोले, उमाकांत धांडे, चंद्रकांत हिंगे, समीर कोळी, सूर्यकांत जैस्वाल, तुकाराम माळी, नरेंद्र बोबडे, नंदकिशोर वाढई, राहुल पिंगळे, वचिष्ट बढे, बाळासाहेब आसबे, पंकज कलसकर, रामचंद्र जोशी, भास्कर जाधव, ज्ञानेश्वर हुकमाळी, निलेश भोईर यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button