ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी शेतमजुराचा मोर्चा धडकला कोरपना तहसील कार्यालयावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

शेतकरी संघटना शेतकरी महिला आघाडी शेतकरी युवा आघाडी व स्वतंत्र भारत पक्ष तालुका कोरपना च्या वतीने भव्य शेतकरी मोर्चा शुक्रवार दि. 3/11/2023 ला कोरपना बस स्टॅन्ड येथून तहसील कार्यालयावर शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार तथा ज्येष्ठ विदर्भवादी नेते अँड, वामनराव चटप यांच्या नेतृत्वात कोरपणा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी तहसील कार्यालयाच्या गेटवर या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अतिवृष्टीत पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात आली नाही.

तसेच खरडून गेलेल्या शेतीला एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी परसोडा येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यात यावा अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना ताबडतोब पट्टे देण्यात यावे शेतीपंपाला पूर्ण दाबाचा वीज पुरवठा करण्यात यावा केंद्र सरकारने विदर्भ राज्य ची तातडीने निर्मिती करावी गडचांदूर आदीलाबाद रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यात यावे जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण करू नये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यात यावा.

असे अनेक मागण्याचे निवेदन कोरपणा तहसीलदार यांना देण्यात आले या मोर्चाला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले,माझी समाज कल्याण सभापती निळकंठ कोरांगे, डॉक्टर भास्कर मुसळे, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत मालेकर,मदन सातपुते,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बावणे,अरुण रागिट, विकास दिवे,दसरथ बोबडे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष ऑड, श्रीनिवास मुसळे, स्वतंत्र भारत पक्षाचे तालुकाध्यक्ष नरेश सातपुते,बंडू राजुरकर,सुभाष तुराणकर, प्रवीण गुंडावार,अनंता गोडे, भास्कर मते,रवी गोकरे,शब्बीर जागीरदार,पद्माकर मोहितकर, रत्नाकर चटक,सचिन बोंडे,विजय धानोरकर तसेच मोठ्या प्रमाणात महिला पुरुष यावेळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये