ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री आनंद नागरी सहकारी बँक चंद्रपूरचे बँकिंग क्षेत्रातील (UPI) ग्राहक सेवेत एक अग्रगण्य पाऊल

चांदा ब्लास्ट

आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत, चंद्रपूर जिल्ह्यातील श्री आनंद नागरी सहकारी बँक UPI सेवा देत आहे.

 बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अरुण एम. वनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. अर्चना एस. अबोजवार यांचे मार्गदर्शन व आय. टी.विभागाचे अधिकारी दीपक अग्रवाल व हर्षल शेंडे यांचे अथक परिश्रम व बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे काम यशस्वी झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहकांना UPI सुविधा देणारी ही पहिली सहकारी बँक आहे.

 उज्ज्वल गौरक्षण संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष सुधाकररावजी चकनालवार, सचिव सी.ए. कमल किशोरजी राठी यांनी बँकेची UPI सुविधा जारी करून ग्राहकांसाठी ही सेवा सुरू केली आहे. यावेळी बँकेचे अध्यक्ष दीपककुमार आर. पारख, उपाध्यक्ष हिम्मतभाई एस. शहा, आणि संचालक दीपक एम. डगळी, संचालक राजेशजी डागा, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य जुगल किशोर सोमाणी आणि उज्ज्वल गौरक्षण संस्थेचे सदस्य मुकुंदजी गांधी, दिनेशजी बजाज, C.A. आनंदजी देशपांडे, हेमंतजी बट्टन, मेहुलजी सचदे, विनोदजी ठक्कर, सुधीरजी बजाज व बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 यूपीआय सुविधा सुरू करताना बँकेने आरबीआयच्या नियमांचे पूर्णपणे पालन केले आहे. याआधीही, बँकेने ग्राहकांच्या हितासाठी ATM, MOBILE BANKING APP IMPS आणि QR CODE इत्यादी अनेक योजना आणि सुविधा दिल्या आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमांनुसार आमच्या ग्राहकांना ज्या काही सुविधा उपलब्ध असतील त्या देण्यासाठी बँक सतत प्रयत्नशील असते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये