Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तहसील कार्यालवर धडकला काँग्रेसचा जन आक्रोश मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर 

तालुक्याच्या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाचा जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले हा जन आक्रोश मोर्चा राजुरा विधानसभेचे आमदार तथा चंद्रपूर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकाचा उपस्थित कोरपना बस स्थानक पासून तहसील कार्यालयाच्या मुख्य मार्गाने मोठ्या प्रमाणात जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयाच्या मुख्य मार्गाने कार्यालय येथे धडकला यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर युवक तसेच महिला तसेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच मागील १० वर्षापासून हुकूमशाही सरकारने जनतेची फसवणूक करण्याचे काम सुरू केले असून सर्व विभागात खाजगीकरण करून अनेक शासकीय संस्था विक्री काढलेल्या आहेत.

तसेच शेतमालाला हमीभाव नाही त्यामुळे या आंधळ्या बहिऱ्या सरकारला जागे करण्याकरिता हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला असे मत राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले यावेळी अनेक मागण्याचे निवेदन तहसीलदार मार्फत देण्यात आले तसेच ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण न देणे बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रातील जातनिहाय जनगणना करणे संविधानातील ३४० कलमानुसार अंमलबजावणी करणे ओबीसी मुलांचे ७२ वस्तीगृह चालू करणे दत्तक शाळा योजना राबून याबाबत शासन निर्णय रद्द करणे विद्यार्थी हितासाठी वीस पटसंख्या खाली शाळा बंद होऊ नयेत.

 यासाठी समूह शाळा संकल्पना रद्द करणे आरसीसीपिएल कंपनी मुकुटबन यांनी परसोडा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी थेट कंपनी मार्फत खरेदी करणे तसेच मुख्य रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याबाबत सोयाबीन पिकावर आलेल्या रोगामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावे तसेच शासनाने सीसीआय केंद्र कोरपना तालुक्यात चालू करणे असे अनेक मागण्या घेऊन जन आक्रोश मोर्चा कोरपना तहसील कार्यालय येथे धडकला तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोट,काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे,सीडीसी बँकेचे संचालक विजय बावणे,संभाजी कोवे, श्याम रणदिवे, गणेश गोडे, आशिष देवकर, सुरेश पाटील मालेगाव, सिताराम कोडापे, अशोक बावणे बाजार समिती अध्यक्ष तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये