ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांचे उपोषण मागे

राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची मधस्थी ; परसोडा येथे अन्नत्याग आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आरसीसीपीएल परसोडा लाईमस्टोन माईस साठीच्या भूसंपादन प्रक्रियेत कंपनी कडून होणाऱ्या मनमानी धोरणा विरुद्ध परसोडा येथील प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांनी मागील अठरा दिवसापासून उपोषण सुरू केले होते. हे उपोषण राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या मध्यस्थी नंतर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मागे घेण्यात आले.

कंपनी संदर्भात बारा मागण्या उपस्थित करून सदर उपोषण सुरू होते.यातच काटकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावली जात होती. त्यांच्या प्रकृतीची काळजी लक्षात घेता. तुर्ततास पुढील मागण्या वर तोडगा निघे पर्यंत लाईन स्टोन खदानीचे मायनिग बंद ठेऊन लवकरच सामोपचाराने कंपनी व प्रकल्पग्रस्त यांची समन्वय बैठक लावून न्याय मागण्यावर चर्चा करण्यात येईल. या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले.

 याप्रसंगी माजी आमदार अड संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, तहसीलदार पी एस व्हटकर, पोलीस निरीक्षक संदीप एकाडे खुशाल बोंडे, किशोर बावणे,रमेश मालेकर भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, शिवाजी सेलोकर, राजू घरोटे,अमोल आसेकर,दिनेश खडसे, रामा मोरे, कार्तिक गोनलावार आदीसह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये