Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे ‘स्पोर्ट्स फीस्टा २के२३’ चे आयोजन

 चांदा ब्लास्ट

‘स्वास्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो.’ विद्यार्थी जीवनात मानसिक विकासासोबतच शारीरिक विकास होणे गरजेचे असते आणि तो विकास फक्त मैदानी खेळ खेळल्याने होतो. याकरिता चांदा पब्लिक स्कूल येथे ‘Sports Fiesta २K२३’ चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी पप्पू देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहन व खेळाडू मशाल पेटवून करण्यात आले.

आचार्य चाणक्य हाऊस मास्टर साधना वाढई, महर्षी पाणीनी हाऊस मास्टर श्री. संघपाल भसारकर, महर्षी चरक हाऊस मास्टर रूहीना तबस्सूम, महर्षी वेदव्यास हाऊस मास्टर जास्मीन हकीम यांनी आपल्या हाऊसचे प्रतिनिधीत्व करत विद्यार्थ्यांसोबत संचालन केले. दि. ०३/११/२०२३ ते ०७/११/२०२३ या पाच दिवसीय खेळाकरीता शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली व लाल, हिरवे, पिवळे व निळ्या रंगाचे फुगे आकाशात उडवून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. विविध खेळाचे प्रात्यक्षिक दाखविणारे नृत्य सादर करण्यात आले.

या नृत्याच्या सादरीकरणाने सर्व खेळाडू व उपस्थितांचे मन उत्साहीत होवून खेळाडूंच्या मनात हर्षोल्हास निर्माण झाला. वर्ग ९ व १० च्या विद्यार्थ्यांनी ‘रस्सीखेच’ Tag of War याचे स्पर्धेतील प्रात्यक्षिक करून दाखविले. शाळेच्या मुख्याध्यापिका आम्रपाली पडोळे यांनी विद्यार्थी जीवनात खेळाला किती महत्त्व आहे व आपण मैदानी खेळ का खेळले पाहिजे हे सांगून विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यास प्रेरीत केले. उद्घाटनाला उपस्थित श्री पप्पू देशमुख यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात मनुष्याला जे धडे शिक्षण शिकवू शकत नाही, ते खेळाचे मैदान शिकविते. जे विद्यार्थी अभ्यासासोबत खेळात भाग घेतात ते विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात, असे वक्तव्य केले. शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक खेळात भाग घेण्यास प्रवृत्त करीत पाच दिवस चालणाऱ्या विविध खेळांसाठी शुभेच्छा दिल्या. तर जे विद्यार्थी जिंकतील त्यांनी खेळ खेळणे बंद करू नयेत, तर जे विद्यार्थी हरतील त्यांनी खेळण्याचा सराव करावा, ते देखील जीवनात यशस्वी होतील. असे वक्तव्य केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षीका निलीमा पाऊनकर, शुभांगी वाकडे तर आभार प्रदर्शन माधवी सिद्धांतम यांनी केले. कार्यक्रम सशस्वी होण्याकरीता शाळा प्रमुख महेश गौरकार, क्रिडा शिक्षक विनोद निखाडे, अमर कडपेवाले, रमेश कोडारी, जयंती मड्डेला, प्रणोती चौधरी, यांनी अथक परिश्रम घेतले तर वंदना बोरसारे, स्मृती मून, शिल्पा खांडरे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये