ताज्या घडामोडी

कोळसा व वाहतूक व्यवसाईक चढ्ढा अडचणीत – आयकर विभागाचा कार्यालय व निवासस्थानी छापा

दिवसभर तपासणी सुरूच - फोन व भ्रमणध्वनी विभागाच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट

शहरातील प्रसिद्ध कोळसा तथा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक चढ्ढा यांच्या चंद्रपूर एमआयडीसीतील कार्यालय तथा नागपुरातील कार्यालयावर एकाच वेळी शंभरावर आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकल्याने कोळसा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

काही महिन्यांपूर्वी नागपुर येथिल कोळसा व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले होते. ह्या छाप्यादरम्यान आयकर विभागाला काही कच्च्या व्यवहाराच्या पावत्या मिळाल्याची माहिती आहे. त्या पावत्यांमध्ये चढ्ढा यांच्या सोबतच्या कच्च्या व्यवहाराच्या पावत्या मिळाल्या होत्या. याच पावत्यांच्या आधारावर व्यवहारांची संपूर्ण माहिती गोळा करून आयकर विभागाने बुधवारी पहाटेच्या सुमारास चढ्ढा यांच्या चंद्रपूर एमआयडीसी येथील कार्यालय तथा नागपुरातील कार्यालय, निवासस्थान येथे छापा टाकला. यावेळी घरातील व कार्यालयातील सर्वांचे भ्रमणध्वनी ताब्यात घेण्यात आले. तसेच कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

मागील आठ ते दहा वर्षांपासून चढ्ढा कोळसा व्यवसायात आहेत. इतक्या कमी कालावधीत चढ्ढा ह्यांनी घेतलेली गगनभरारी अनेकांचे लक्ष वेधुन घेत होते व ह्यामागे काहीतरी काळेबेरे असल्याची चर्चाही व्हायची मात्र ह्या छाप्यामुळे व्यावसायिक गुपिते बाहेर येण्याची शहरात चर्चा असुन आयकर विभाग चढ्ढा ह्यांच्या सर्व व्यवहारांचीही तपासणी करीत असल्याचे सुत्रांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये