ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकूने हल्ला केल्याच्या आरोपामध्ये पाच वर्ष सक्त कारावासाची शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा येथील मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, वर्धा श्री आशुतोष करमरकर यांचे न्यायालयाने आरोपी धनराज कावळे. स. ह. मु. सेलुकाटे जि. वर्धा याने दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून चाकुने भोसकून जिवाने मारण्याच्या हेतूने जख्मी केल्याप्रकरणी भा.द.वि. चे कलम ३०७ अन्वये पाच वर्ष सवत कारावासाची शिक्षा आणि रु. ६,०००/- दंड व दंड न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच रु ५०००/- मी मदनलाल सुखचंद धुवारे यांस नुकसान भरपाई म्हणुन देण्याचा आदेश केला आहे.

घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी सौ सिमा मदन धुवारे, रा. सेलुकाटे जि. वर्धा हाँवा प मदन सुखचंद धुवारे रा. मौजा सेलुकाटे हयाचे रोडच्या बाजूलाच सायकल पंक्चरखे दुकान आहे. त्याच गावात पांडुरंग चौधरी यांचा जावई आरोपी धनराज कावळे रा. टाकळघाट जि. नागपूर हयाने फिर्यादीच्या पतीच्या सुजला शेजारी तटटयाचे शेड लाइन हॉटेल लावले होते. आरोपी धनराज कावळे हा नेहमीच फिर्यादीवा पती सदन धुवारे यास दारु पिण्यासाठी पैसे मागून व्रास देत होता. घटनेच्या दिवशी म्हणजेव दि. २०/०८/२०१५ रोजी सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान फिर्यादीचा पती मदन धुवारे गुलीला जून्या वस्तीत शाळेत सोडून देण्याकरीत मोटर सायकलने गेला असता गावातच काही कामानिमित्त थांबला त्या ठिकाणी आरोपी धनराज कावळे हा सुध्दा मोटर सायकलने आला आणि फिर्यादीचा पती मदन धुवारे यांस म्हणाला की, मी गावातला डॉन आहे, माझा मो… भाउ माझ्या पेक्षा मोठा डॉन आहे, असे म्हणून दारु पिण्याकरीता रु. २००/- दे’ असे म्हटले आणि पैसे दे या कारणावरून मदन धुवारे याचसोबत वाद घातला व जिवाने मारण्याच्या उददेशाने मदन धुवारे याचे गळ्यावर चाकुने वार केला. जख्मी व रक्तबंबाळ अवस्थेत मदन धुवारे आरोपी धनराज कावळे याचे तावडीतून सुटून रुपेश वैद्य याचे घरी आला आणि घडलेली हकिकत सांगीतली रुपेश वैद्य याने फिर्यादी सौ सिमा रे हीला बोलावून बेशुध्दावस्थेत जख्मी मदन धुवारे यांस सरकारी दवाखाना येथे उपचारासाठी घेउन गेले फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे आरोपीविरुद्ध कलम ३०७ भा. दं. वि. चा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर प्रकरणाचा तपास श्री विशाल दांडगे, परिविक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक, पोस्ट सेवाग्राम जि वर्धा यांनी केला तपासा दरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने अप क २७८ / २०१५ नुसार दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले

सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या बाजुने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, श्रीमती रत्ना और घाटे यांनी कामकाज पाहीले व यशस्वि युक्तिवाद केला. तसेच पैरवी अधिकारी सेवा निवृत्त ए एस. आद दिगांबर गांजरे आणि पोलीस नायक जयेश डांगे ब. नं. १२३२ पोलीस स्टेशन सेवाग्राम जि वर्धा यांनी साक्षीदारांन न्यायालयात हजर करून मोलाची कामगिरी बजावली. शासनातर्फे एकूण १६ साक्षदार तपासण्यात आले व सरकार पक्षाला मदत केली. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरूज मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, दया श्री. आशुतोष करमरकर यांचे न्यायालयाने यांनी आरोपीस आज दि ०३/०८/२०२३ भा. द. वि. चे कलम ३०७ अन्वये पाव वर्ष सक्त कारावासाची शिक्षा आणि रु. ६,०००/- दंड व दंड न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच रु. ५०००/- जख्मी मदनलाल सुखवंद धुवारे यां भरपाई म्हणुन देण्याचा आदेश केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये