जागतिक कविता दिनाचे निमित्त काव्य मैफिलचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जागतिक महिला दिना निमित्त आयोजित”आम्ही सिद्ध लेखिका अकोला “तर्फे घेण्यात आलेली छोटेखानी टेरेस वरील काव्य मैफिल, सौ. रोहिणी अशोक गंधेवार यांनी आपल्या घरी आयोजित केली होती.सर्व प्रथम मा. देवकामाई आणि गंधेवार ताई यांनी सरस्वतीच्या मूर्ती पूजनाने आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ केला. स्कार्फ, गजरा आणि मराठमोळी नथ देऊन, सौ. गंधेवार ताईंनी मा. देवकामाईचा आणि मा. ममता ताईचा सत्कार केला.
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ही मैफिल संपन्न झाली.
मैफिलीच्या अध्यक्ष स्थानी मा. देवकामाई देशमुख आणि प्रमुख अतिथी म्हणून मा.प्रा. डॉ.ममताताई इंगोले या होत्या.
या कार्यक्रमाचे संचलन संगीताताई ताथोड यांनी केले. मान्यवरांचा परिचय, ज्योतीताई कुलकर्णी आणि अमिता घाटोळ यांनी करून दिला.
या काव्य मैफिलीत सौ, रोहिणी गंधेवार, सौ. ज्योती कुलकर्णी, सौ.संगीता ताथोड, सौ. सविता भुजबळ, सौ. नेहा धारूळकर,सौ अमिता घाटोळ,सौ प्रतिभा पाथ्रीकर,यांनी आपल्या दमदार कविता सादर केल्यात.सौ. अरुणा रोडे यांनी एक सत्यकथा वाचून दाखवली.प्रत्येक कविता वैशिष्ठ्यपूर्ण अशीच होती. कोणी सामाजिक, कौटुंबिक, नाते संबंध, स्त्री विषयक,महिलांचे सामाजिक योगदान इत्यादी सामाजिक विषय घेऊन कविता सादर केल्या आणि श्रोत्यांची मने जिंकून घेतली.
मा. देवकामाईंनी शेर सादर करून कविता सादर केली. त्यांनी आपल्या भाषणातून मोलाचे मार्गदर्शन केले.मा. ममताताईनी आपल्या भाषणात त्यांची शिक्षणासाठी झालेली संघर्षमय धडपड आणि स्वतःच्या प्रकृतीत आलेल्या प्रचंड अडचणी कथन करून त्यातून मार्ग कसा काढला या बाबतीत हृद्य कथन केले. सर्वांनी यातून प्रेरणा घ्यावी असाच संदेश होता. सावित्री बाई फुले सारखीच त्यांची शिक्षणासाठी धडपड होती असे त्यांच्या भाषणातून कळाले.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही काव्य मैफिल रंगली आणि सर्वच कवयित्री च्या सहभागामुळे या मैफिलीस चार चांद लागले.
सौ. सरिता विसपुतेनी सर्वांचे उस्फुर्तपणे फोटो घेऊन ही कार्यक्रमाची आठवण चिरंतन केली.
उपस्थित श्रोत्यांनी प्रत्येक कवितेस मनापासून दाद दिली आणि प्रोत्साहन दिले. आभार प्रदर्शन सौ. सोनल राजणकर यांनी केले.अल्पोपहार देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.
ही काव्य मैफिल “आम्ही सिद्ध लेखिका अकोला “या समूहाची अकोल्यातील पहिली आणि संस्मरणीय अशीच होती



