निराधारांचे अनुदान तात्काळ जमा करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…
निराधारांसमवेत आंदोलन करू, राजू झोडे यांचा इशारा
चांदा ब्लास्ट
मागील तीन महिन्यांपासून निराधारांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही, त्यामुळं निराधारांची दिवाळी अंधारात जाणार असून निराधारांचे अनुदान तात्काळ बँक खात्यात जमा करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निराधारांसमवेत आंदोलन करू असा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी जिल्हा प्रशासन व राज्य सरकारला दिला आहे.
निराधार व्यक्तींना राज्य शासनाकडून आपली उपजीविका चालविण्यासाठी अनुदान दिले जाते.हे अनुदान सदर निराधारांच्या बँक खात्यात जमा होते.मात्र मागील तीन महिन्यांपासून निराधारांच्या बँक खात्यात पैसे जमा न झाल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाणार की काय? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.विशेष म्हणजे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निराधारांच्या अनुदानात वाढ झाल्याचा गवगवा केला तर मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला होता.
मात्र, मागील तीन महिन्यांपासून बँक खात्यात रकम जमा न झाल्याने निराधार बांधव हताश झाले आहेत.त्यामुळं निराधांरांचे अनुदान तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करा अन्यथा जिल्हाधिकारी यांना घेराव घालून जिल्हाधिकारी कार्यालयासामोर तीव्र आंदोलनाचा इशारा राजू झोडे श्यामभाऊ झिलपे जया गेडेकर आशा लभाणे जाकिर खान यांनी दिला आहे.