ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती तथा प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या.

प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव धनंजय गोरे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे उपस्थित होते, सर्वप्रथम इंदिरा गांधी व वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, प्रा सुधीर थिपे यांनी मनोगत व्यक्त केले.संचालन व आभार प्रदर्शन प्रा. शेख मॅडम यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये