ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रियदर्शनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दीक्षांत समारंभ

कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थानी केले रक्तदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

कौशल्य विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या आदेशा नुसार प्रियदर्शनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावती येथे रक्तदान शिबिर तथा दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक धनंजय गुंडावार, समाजसेवा अधीक्षक पंकज पवार, डॉ. यशवंत घूमे, भोजराज झाडे, धर्मेंद्र हवेलीकर, विवेक सुरावार, प्राचार्य पी व्ही बालसराफ आदी उपस्थित होते या दीक्षांत समारंभात २०२३ मधील गुणवंत विद्यार्थी दर्शन फुलझले, प्रज्वल मत्ते, सत्यवान निखाडे, स्वप्नील पोईनकर, सुजल देशकर यांना कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र तसेच सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात मोठ्या संख्येने विद्यार्थानी रक्तदान केले. या कार्यक्रमाला काकडे, सय्यद ,मेघा डोये, चौधरी आधी शिक्षकासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये