ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णालयाची मोठी गैरसोय 

वैद्यकीय अधिकार्यांना वेळेच बंधन नाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरटकर

     ग्रामीण रुग्णालय कोरपणा येथे रुग्णाची मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याने रुग्णाची रांगा लागत आहे.एक दोन तास रुग्णांना उपचारासाठी थांबावे लागत आहे .ग्रामीण रुग्णालंय कोरपणा येथे एकच वैद्यकीय अधिकारी बाह्य रुग्ण व आंतर रुग्ण तपासनी करित असल्याने रुग्णांना मोठा मनस्ताप होत असल्याचे चित्र ग्रामीण रुग्णालंय कोरपणा येथे दिसत आहे.

आज कोरपणा परिसरात साथी च्या रोगाची साथ सुरु मात्र एकच वैद्यकीय अधिकारी दोन्ही विभाग सांभाळत आहे.तसेंच तीन चार दिवस एकच वैद्यकीय अधिकारी रात्रोदिवस कर्तव्य बजावत आहे.एक वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकारी असून आपापल्या सोईनुसार आपल्या पाळ्या लावून कार्य करीत आहे. दि. 13 ऑकटोंबर ला सकाळची ओ.पी.टी. काढण्यासाठी चार वैद्यकीय अधिकारी असून शुद्धा एकही हजर नाही हा प्रकार म्हणजे येथील वैद्यकीय अधिकारी यांचे नियंत्रण नाही अर्धा एक तास ओ.पी.टी.सुरु होण्याचा प्रकार घडत आहे.मात्र या ठिकाणी काही अधिकारी हे येथील कर्मचार्यांना तंभी देत असल्याचे बोलले जात आहे.

रुणाची गर्दी असल्यामुळे कमीत कमी बाह्य रुग्ण एक् व आंतर रुग्णा साठी एक वैद्यकीय अधिकारी आवश्यक आहे मात्र तसे दिसत नाही. रुग्णाल्यात रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही .तसेंच रुग्णवाहिका 102 ची नियमित स्वच्छता होत नसल्याचे रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईका कडून एकवण्यात येत आहे.तसेंच रात्रीच्या वेळी आलेल्या रुग्णाची तपासनी साठी काही वैद्यकीय अधिकारी टाळाटाल करीत असल्याचे बोलले जात आहे रात्री उपस्थित कर्मचारी उपचार करून रुग्णाचे समाधान करित असल्या बाबत चर्चा होत आहे.

या गंभीर बाबीकडे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लक्ष देऊन वैद्यकीय अधिकारी द्यावा मागणी रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईका कडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये