Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रकल्पग्रस्तांचा अरबिंदो कोळसा खाणीवर आज मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             गावकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी येथील प्रकल्पा लगतच्या संपूर्ण शेतकरी प्रकल्पग्रस्त आपल्या न्यायीक मागण्यासाठी अरबिंदा कोळसा खान बेलोरा येथे मोर्चा काढून काम बंद आंदोलन आज १३ ऑक्टोबरला शुक्रवारला करणार आहेत.

 अरबिंदो खुली कोळसा खान बेलोरा ही प्रकल्प चालू करण्यासाठी या भागातील किलोनी, टाकळी , बेलोरा, जेना, पानवडाळा, डोंगरगाव येथील शेतकरी व गावकऱ्यांची भूलथापा घालून दिशाभूल करून कोळसा खाणीचे काम चालू केले आहे.

त्याकरता शेतीचा योग्य मोबदला ठरवून सर्वप्रथम संपूर्ण शेती संपादित करावी नंतरच काम चालू करावे, स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे, बेलोरा गावाचे पुनर्वसन कोंढा फाटा ते कोळसा खान पर्यंत संपूर्ण शेती संपादित करावी जुन्या डागा खानीतील निघणारे पाणी या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला देण्यात यावे इतर मागण्या घेऊन हे प्रकल्पग्रस्त अरबिंदो कोळसा खाणीवर धडकणार असल्याने या मोर्चामध्ये जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांनी कोंढा फाटया जवळ सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये