Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती तहसीलवर धडकले पांढरे वादळ महामोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- बंजारा समाजात होणाऱ्या राजपूत फकीर या जातीची बोगस घुसखोरी च्या विरोधात, क्रिमिनल जातीचा रेकार्ड न पाहता क्रिमिनल ट्रायीब चा हक्क/दावा बंद करावा, २४ नोव्हेंबर २०१७ चे रक्ताने संबंधित शासन अधिसूचना रद्द करावी, नॉन क्रिमिलियर् ची अट रद्द करावी,SIT समिती स्थापन करून बोगस घुसखोरी करणाऱ्यावर कारवाई करावी, तालुक्यातील ३३ हजार हेक्टर अतिक्रमीत जमीन धारकांना कायम स्वरूप पट्टे देण्यात यावे, तसेच जिवती नगर पंचायत मधील पंतप्रधान आवास योजनेतील मंजूर असलेले ६६४ घरकुल बांधकामांना शासनाचे ना हरकत प्रमाण पत्र देऊन घरकुल उपलब्ध करून द्यावे अश्या अनेक मागण्या घेऊन पांढरे वादळ महामोर्चा कृती समिती जिवतीच्या वतीने जिवती तहसील कार्यालयावर ९ ऑक्टोबर ला पांढरे वादळ महामोर्चा काढण्यात आला.

           पोरियानगरी(रामनगर,जिवती) येथील ढफाच्या तालावर विविध गावांतील महिला व पुरूषांनी आरक्षण हक्काच्या मागण्या घेऊन शांततेत हा मोर्चा काढण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत जमलेल्या बंजारा समाजबांधवांना आरक्षणात बोगस घुसखोरी कसे केले जात आहे.याबाबत जनजागृती केली आणि न्याय हक्कासाठी सदैव बंजारा समाजाने तयार राहण्याचे अहवान केले.यावेळी कार्यक्रम स्थळी नायब तहसीलदार यांनी उपस्थिती दर्शवून पांढरे वादळ महामोर्चा कृती समितीचे निवेदन स्वीकारले.यावेळी विविध गावांतील हजारोच्या संख्येने महिला व पुरूष उपस्थित झालेल्या पांढरे वादळ महामोर्चातील कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक राठोड,रविकांत राठोड,राजपाल सिंग राठोड,विश्वनाथ राठोड, सुरेश राठोड,राजेश राठोड, संजय राठोड, डॉ.गणेश चव्हाण, अभि.विक्की राठोड,विलास रामावत,अमर राठोड, पांडुरंग जाधव, डॉ.पंकज पवार,कैलास राठोड,जिवती नगरपंचायतीचे नगराध्यक्षा कविता आडे,मा.जि.प.सदस्या कमलताई राठोड,सभापती अंजना पवार,ममताजी जाधव,राजेश राठोड,सुदाम राठोड,गणपत आडे, प्रकाश पवार, सतिश राठोड,गणेश करमटोट,विकास चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पांढरे वादळ महामोर्चा शांततेत पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये