तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण संपन्न
पंचायत समिती सावलीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
समग्र शिक्षा 2025-26 अंतर्गत मूल्यवर्धन तालुकास्तरीय प्रशिक्षण ( TOT ) 3.0 शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळा इत्यादी इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी ला शिकविणा-या 100% शिक्षकांना दयावयाचे नियोजित आहे.
त्या अनुषंगाने वरील शाळेतील 50% शिक्षकांचे प्रशिक्षण पहिला टप्पा विश्वशांती विद्यालय, सावली येथे दिनांक ३०सप्टेंबर २०२५ ते ०३ ऑक्टोंबर २०२५ या दरम्यान सकाळी १० ते ५ या दरम्यान घेण्यात आले.सदर प्रशिक्षचे उद्घाटन कार्यक्रमकरीता अध्यक्ष म्हणून रविंद्र मुप्पावार मुख्याध्यापक विश्वशांती विद्यालय तथा ज्युनिअर कॉलेज सावली, उदघाटक वैभव खांडरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सावली,प्रमुख पाहुने किशोर बारसागडे विस्तार अधिकारी (शिक्षण)व्याहाड खुर्द,जीवन भोयर केंद्र प्रमुख केंद्र अंतरगाव व किशोर आंनदवार केंद्र प्रमुख केंद्र -सामदा हे उपस्थित होते .सर्व उपस्थित शिक्षकांना उदघाटक व अध्यक्ष यांनी मूल्यशिक्षण व मूल्यसंवर्धन या प्रशिक्षणाची गरज का भासली यावर आधारीत दाखले देऊन भूमिका स्पष्ट करुन सदर प्रशिक्षणानंतर शाळास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावी या बाबत मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण उद्घाटनीय कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रमोद भोयर विषय साधन व्यक्ती,प्रास्ताविक नितेश चौधरी मूल्यवर्धन सम-न्वयक तसेच आभार प्रदर्शन प्रज्ञा सोनटके विषय साधन व्यक्ती यांनी केले.प्रशिक्षणाकरीता एकूण 199 शिक्षकांनी नोंदणी केली असुन तीन कूला मध्ये विभागणी करुन प्रशिक्षण घेण्यात आले.प्रशिक्षणा करिता सुलभक म्हणून विवेक दुधे,सविता नंदनवार,नश्वरकुमार गेडाम योगेश रामटेके, संदेश मानकर, रजनी रामगीरवार, अशोक गावंडे ,ईश्वर अर्जुनकर व देवराव सहारे यांची निवड करण्यात आली. एका कूलाला तीन सुलभक या प्रमाणे नियोजन करण्यात आले.सर्व कूल मध्ये प्रोजेक्टर व साऊड बॅाक्स लावण्यात आले.
सदर प्रशिक्षण यशस्वी होण्याकरीता गट साधन केंद्र,सावली सर्व कर्मचारी यांचे अमुल्य योगदान लाभले. अश्या प्रकारे मूल्यवर्धन तालुकास्तरीय प्रशिक्षण आनंददायी व खेडीमेळीच्या वातावरणात पार पडले.