Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धर्मवीर प्रतिष्ठान गणेश मंडळ ने सामाजिक संदेश देत केले गणरायाचे विसर्जन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गणेश मंडळ,यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये,महिलांनी समाजात काही विदूषक लोकांपासून कसे सावध राहावे याबाबत संदेश दिला. छत्रपती शिवराय यांच्या काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा होती, तीच शिक्षा त्या नराधमाला द्यावी असे फलक दाखवून महिलांवर होणारे अत्याचार थांबावे व गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी.

असे संदेश दिले.मित्रा स्वतःच्या बहिणीसाठी वाघ असेल तर दुसऱ्याच्या बहिणीसाठी पिसाळलेला कुत्रा बनवू नकोस, .मुलींनो हे कलियुग आहे शस्त्र घेऊन फिरा म्हणजे नराधमांना वस्त्र काढायची वेळ येणार नाही, तसेच महिला रीलस्टार ला विनंती हिंदू संस्कृतीला शोभतील असे कपडे वापरून व्हिडिओ काढा, तुमचे व्हिडिओ बघणारे लहान मुलं तुमचा आदर्श घेतील आपल्याला नवीन पिढी घडवायची आहे बिघडवायची नाही. हा संदेश देत गणरायाचे शांततेत विसर्जन केले.

या मंडळाचे अजित सिंग बावरे, विशाल पवार,नागेश ठाकूर, मुन्ना ठाकूर, दयासिंग बावरे, अरुण शिवारकर, संकेत पिंपळे, अमोल वाघमारे, जोगिंदर सिंग बावरे, निलेश राठोड, कुणाल पिंपळे, अविनाश पवार, वैभव पंडित, बलजीत सिंग बावरे, आदित्य शिवरकर, अरविंन शिवरकर, अमोल वाघमारे, रामा शिवरकर, आदित्य गुप्ता, कृष्णा तळेकर, कैलास पवार, प्रेम हटकर, रोहित हटकर, सागर भाग्यवंत, धर्मविर प्रतिष्ठान मंडळातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये