गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरात नकली दारु तयार करणाऱ्या कारखान्यावर तसेच अवैद्य विदेशी दारु विक्री करणाऱ्यावर कारवाई

स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा विशेष पथक यांचेकडुन कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. पोलीस अधीक्षक, श्री. नूरुल हसन यांनी वर्धा जिल्ह्यात चालणाऱ्या अवैद्य दारू तसेच अवैद्य धंद्यांवर कारवाई करणे करीता स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथे विशेष पथक तयार करण्यात आले असुन सदर विशेष पथक संपूर्ण वर्धा जिल्ह्यात अवैध रित्या चालणाऱ्या व्यवसायांवर कारवाई करीत असतात.

दिनांक ०४.०७, २०२३ रोजी मुखबीर कडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली कि, नागठाणा (रोठा) परीसरात वेंकटेश नगरी या बिल्डींग मध्ये फ्लॅट नंबर जि-२ मध्ये १) स्वप्नील रेवतकर, २) आकाश भोयर दोन्ही रा. वर्धा हे अवैद्य बनावट दारु तयार करुन वर्धा शहरात विक्री करीता पाठवित असतात. अशी माहीती प्राप्त झाल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांना माहीती दिली देवुन त्यांचे आदेशाप्रमाणे स.पो.नि. संदिप कापडे व विशेष पथक यांनी नागठाणा (रोटा) येथील व्यंकटेश नगरी अपार्टमेंट येथे जावुन खबरेप्रमाणे फ्लॅट नबंर जि-२ ची पाहणी केली असता सदर फ्लॅटला लॉक लागलेले दिसून आल्याने मागील दरवाज्याची पाहणी केली असता दरवाजा उघडा दिसल्याने मागील दारातून आत जावुन पाहणी केली असता सदर फ्लॅटमध्ये अवैद्य बनावट दारू बनविण्याचे साहित्य मिळुन आल्याने १) गोवा कंपनीच्या विदेशी दारुच्या ७५० एम.एल. च्या १२ प्लॉस्टीक शिश्या कि. ६३०० रू. २) ओ.सी. कंपनीच्या विदेशी दारुच्या १८० एम.एल. च्या २ शिश्या कि. ५०० रू. ३) एका पांढऱ्या कागदामध्ये गांजा अंमली पदार्थ एकुण वजन ७४ ग्रॅम कि. ७०० रू., ४) स्टरलींग रिजर्व बी १० विदेशी दारुचे १७ खाली खोके कि. १७० रू. ५) बनावट विदेशी दारु तयार करीता लागणारे बॉटलचे झाकन, बॉटलवरील लेबल इत्यादी साहित्य कि. ९०० रू. असा एकुण जु.कि. ८५७० रू. चा माल जप्त करून ताब्यात घेवून वरील आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) येथे अपराध क्र. ३६६ / २०२३ कलम १२० (B), ३२८, ४२०, ४६७, ४७१ भा.दं.वि. सहकलम ६५ (३), ६५ (b), ६५ (c), ६५ (d), ६५ (e), ६५ (f), ६७, ६७-१८, ६७८, ७२, ७७ (३), ८३, ८६, १०८ महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम २०, २९, ८(c) NDPS Act सहकलम ६३ प्रतिलीपी अधिकार अधिनियम १९५७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

वरील गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेत असतांना मुखबीर कडुन माहीती प्राप्त झाली कि, सावंगी (मेघे) ग्रामपंचायत कार्यालय जवळ राहणारा योगेश पेटकर हा आपले घरी देशी व विदेशी दारु बाळगुण तिची विक्री करीत आहे. अशा खात्रीशीर माहीतीवरुन यातील आरोपीचे राहते घराचे समोर रेड केला असता तेथे आरोपी नामे अमर रामटेके रा. सावंगी हा देशी व विदेशी दारु बाळगुण मिळुन आल्याने त्याचे ताब्यातून देशी दारुच्या १०० शिश्या, विदेशी दारुच्या वेगवेगळ्या कंपनीच्या एकुण ११२ शिश्या, बियरच्या वेगवेगळ्या कंपनीचे टिनाचे एकुण ३१ डब्बे, बॉटलींग साठी लागणारे झाकण, कंगवा व चाकु तसेच एक सुझुकी कंपनीची मोपेड दुचाकी वाहन क्र. एम.एच. ३२/ए. आर. ८७७१ असा एकुण जु.कि. १,४०,७०४ रूचा माल जप्त करून पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) येथे अपराध क्रमांक ३६७/२०२३ कलम १२० (B), ३२८,४२०, ४६७, ४७१ भा.दं.वि. सहकलम ६५ (a), ६५ (b), ६५ (c), ६५ (d), ६५(e), ६५ (f), ६७, ६७-१८, ६७८, ७२, ७७ (३), ८३, ८६, १०८ महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम ४. २५ भारतीय हत्यार कायदा सहकलम ६३ प्रतिलीपी अधिकार अधिनियम १९५७ अन्वये आरोपीतांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील अटक आरोपीस गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता आरोपी हे वैद्यकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांना दारु विकत असल्याचे सांगत असुन त्याचा सुध्दा तांत्रीक दृष्ट्या तपास करण्यात येणार आहे व तपासात वैद्यकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आढळून आल्यास त्याचेवर सुध्दा कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप कापडे स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल, वर्धा व पोलीस अंमलदार रोशन निंबोळकर, विशाल मडावी, सागर भोसले, अभिजीत गावंडे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, प्रशांत आमनेरकर व महिला पोलीस अंमलदार मिना कोरती सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये