ताज्या घडामोडी

अवैध कत्तल खाण्यावर पोलिसांची धाड

दोन गोवंश कापलेल्या अवस्तेत जप्त

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती –
दिनांक १६ जून ला पहाटे सुत्रां कडून मीळालेल्या गुप्त माहिती नुसार स्थानिक डोलारा तलाव परिसरात गोवंश कापणार असल्याची माहिती पो. नि. इंगळे. यांना मिळाली
मिळालेल्या माहिती नुसार इंगळे यांनी त्याच्या चमु सह सापळा रचून सकाळी ६ वाजता अबू कुरेशी याच्या घरी धाड टाकली.
या धाडीमध्ये दोन इसम शकील रहेमान शेख (४०) रा. भद्रावती व महोम्मद बिराम शेख (३२) रा. डोलारा हे दोघेही हातात धारदार शस्त्र घेवून गोवंश कापत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना अधीक विचारपूस केली असता सदर कृत्य अबू कुरेशी रा. डोलारा याच्या
सांगण्यावरून मास विक्री करीता केले असल्याचे सांगितले. अबू याच्या घराची झळती घेतली असता आणखी ३ जिवंत जनावरे तिथे आढळून आली. घटनास्थळी मिळालेल्या जनावरांबाबत विचारणा केली असता हि जनावरे अबू याच्या मांगली येथिल जंगल परिसरात गुप्त ठिकाणी
असलेल्या फार्म हाऊस इथून आणले असल्याचे त्यांनी सांगितले . सदर फार्म हाऊस ची झळती घेतली असता तिथे आणखी १३ गोवंश बंदिस्त अवस्तेत आढळून आली. सदर गोवंशांना पंचाच्या समक्ष ताब्यात घेण्यात आले. अबू चे फार्म हाऊस इथून १३ व त्याचे अवैध कत्तलखाण्यातुन जप्त केलेले ३ अश्या १६ गोवंशाची किंमत एकूण १,१२,००० असून या सर्व गोवंशांना जैन मंदिर येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे. मुख्य आरोपी अबू कुरेशी रा. डोलारा याच्या सह शकील रहेमान शेख (४०) रा. भद्रावती व महोम्मद बिराम शेख (३२) रा. डोलारा या तिघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सुधारणा सन १९७६ चे सुधारणा सण २०१५ चे कलम ५, ५ अ , ५ ब, ९, ११, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन ताब्यात असलेले आरोपी शकील रहेमान शेख व महोम्मद बिराम शेख या दोघांनाही मा.न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . मुख्य आरोपी अबू हा फरार असून भद्रावती पोलीस त्याचा कसून तपस करीत आहेत. मागील काही दिवसात तालुक्यातील गोवंश चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते ज्या मुळे स्थानिक शेतकरी व नागरिक यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते . त्या संदर्भात “चांदा ब्लास्ट ” पोर्टल च्या माध्ममातून शेतकऱ्यांच्या व जणतेच्या व्यथा मांडण्यात आल्या होत्या. मिळालेले गोवंश यांच्या त्या चोरी गेलेल्या गोवंशाशी काही संबंध आहे का याचा तपास भद्रावती पोलीस करीत आहेत .
सदरची कारवाई भद्रावती पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक विपीन इंगळे गुन्हे शोध पथकाचे सपोनि. विशाल मुळे, विश्वनाथ चुदरी, जगदिश झाडे, अनुप आष्टूनकर, निकेश ढ़ेंगे व मोनाली गारघाटे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये