ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गटसाधन केंद्र, सावली अंतर्गत जनभागीदारी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. चंद्रशेखर प्यारमवार

‘वसुधैव कुटुम्ब़कम’ या भारतीय तत्वज्ञानावर आधारित G 20 summit दि. १९ जून ते २२ जून २०२३ या दरम्यान पुणे येथे होणार आहे. त्यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हा विषय केंद्रस्थानी आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मिशन मोडमध्ये २०२६-२७ पर्यंत प्रत्येक बालकाला साध्य़ करणे, याची सुनिश्चिती करावयाची आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयात वाडी, वस्ती, तांडा, पाडया वरील प्रत्येक बालकास पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विहीत मुदतीत साध्य़ करून दयावयाचे असल्याने गुणवत्तापूर्ण पायाभूत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होणे आवश्य़क आहे त्यासाठी जनचळवळ होण्याची गरज आहे.

या हेतूने मा. राजकुमार हिवारे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर, मा. दिपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी, जि.प. चंद्रपूर, मा. धनंजय चापले, वरिष्ठ़ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर, मा. विनोद लवांडे, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांच्या प्रेरणेतून व मा. लोकेश खंडाळे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सावली यांच्या मार्गदर्शनाखली चंद्रपूर जिल्हांतर्गत गटसाधन केंद्र सावली मार्फत ‘जनभागीदारी उपक्रम़’ सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये व गावतपातळीवर १ जून ते १५ जून, सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत या कालावधीत अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आला.यामध्ये गावातील नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य़ गण, अंगणवाडी कार्यकर्ती, मॅजिक बस कार्यकर्ते, मुख्याध्यापक, शिक्षक, विदयार्थी तसेच पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचारी सक्रिय सहभागी झाले होते. यामध्ये SCERT मार्फत दिलेल्या नियोजनानूसार दरदिवशी विविध कार्यक्रम उत्स्फुर्त व सकारात्मकतेने व उत्साहाने घेण्यात आले. या उपक्रमाकरिता पंचायत समिती सावली अंतर्गत शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व साधनव्यक्ती, अपंग समावेशित शिक्षण तज्ञ व विशेष शिक्षक यांनी सहकार्य केले.

(विशेष बाब)-महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, महाराष्ट्र शासन यांच्या सोशन मिडिया हॅन्ड़ल वरून व्टिटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यु-टयूब वर पंचायत समिती सावली अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोखाळा या शाळेतील उपक्रमाच्या व्हिडीओची शाळेच्या नावासह दखल घेण्यात आली तसेच काही शाळातील व्हिडीओंचा सुध्दा समावेश करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये