Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जीव गेल्यावर मोकाट जनावरांचा बंदोबस्त होणार क़ाय ?

नागरिकांचा संतप्त सवाल ; मुख्य मार्गावरच मोकाट जनावरांचा ठिय्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर वसलेले  सावली  नगरातिल  मार्गावर   सध्या पाळीव जनावरानी आपले बस्थान सुरु केल्याने  वाहतुकीला अङथळा निर्माण होत  बसलेल्या जनावराच्या ठिय्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने जीव गेल्यावरच मोकाट जनावरांचा बन्दोबस्त होणार क़ाय? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे सदर महामार्गावरून वाहनाची  वर्दळ मोठ्या प्रमाणात होत बसलेल्या जनावरांच्या कळपात झुंड सुधा होत असते परिणामी महामार्गावर जनावरे सैरावैरा धावत सुटतात.
 त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही असे अनेक प्रकार सदरच्या मार्गावर निर्माण झाले असताना असा गंभीर बाबिकडे दुर्लक्ष केल्या जात आहे सध्या शाळा, महाविद्यालय सुरू असल्याने सकाळपासून ते सायंकाळपर्यंत विद्यार्थ्याची, वाहनाची व प्रवाशांची या महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशातच नेहमीप्रमाणे पावसाळ्यात पशुपालकांनी आपली जनावरेही मोकळी सोडलेली आहे.  ही मोकाट  जनावरे राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध ठिय्या मांडून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका बळावला आहे.
 हे नित्याचेच असल्याने वाहन चालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.  मात्र अशा गंभीर बाबीकडे सावलीचे नगर प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सावली शहरासह लगतच्या परिसरातील पशुपालक दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, आपली जनावरे मोकाट सोडत असतात. आताही तीच परिस्थिती सावली शहरात पहावयास मिळत आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत बाजार चौक, आंबेडकर चौक, जुना बस स्थानक चौक, फुले चौक या परिसरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार असतो.  बरेचदा रात्रीच्या वेळेस मोकाट  जनावरांचे अपघात होऊन परिणामी प्राण सुद्धा गमवावे  लागले आहे.  तर मोकाट जनावरामुळे प्रवाशांचे किरकोळ अपघात सुद्धा झालेले आहेत.
त्यामुळे जनावरे मोकाट  सोडणाऱ्या पशुपालकावर कठोर कारवाई करून मोकाट  जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
शहरातील राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसत असल्याने दुचाकीसह चार चाकी वाहने काढताना तारेवरची कसरत करावी लागते.  बरेचदा वाहन चालक आपली वाहने उभी ठेवून या जनावरांना बाजूला करून मार्गक्रम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
जीव गेल्यावरच जनावरांचा बंदोबस्त होणार का?
सावली शहरातील राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांची गर्दी वाढायला लागली आहे.  या गर्दीतून वाहन चालविताना कसरत करावी लागते.  मोकाट  जनावरे या मार्गावर धावत असून यांच्यामध्ये कधीकधी टक्करही होते. त्यामुळे ही टक्कर कोणाच्या अंगावर किंवा वाहनावर जाईल याचा काही नेम नाही. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये