ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली शहारत जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

शेकडो रुग्णांना फळ वाटप, वृक्षारोपनाचा स्तुत्य उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

जागतिक फार्मासिस्ट दिन दरवर्षी २५ सप्टेंबरला‎ साजरा केला जातो. फार्मासिस्ट किंवा ज्याला आपण‎ सामान्यतः केमिस्ट किंवा ड्रगिस्ट म्हणतो ते महत्वाचे वैद्यकीय‎ व्यावसायिक आहेत.आपण मेडिकल स्टोअरमध्ये औषधे‎ घेण्यासाठी गेलो, तर केवळ फार्मासिस्टच ती औषधे‎ विकतात. फार्मसी क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी आज त्यांना‎ सन्मानित करणे आवश्यक आहे.

आज सावली शहरात फार्मसी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामीण रुग्णालय सावली येथे वैद्यकिय अधिक्षक डॉ. वाघधरे यांच्या उपस्थितीत फार्मसिस्ट प्रतिज्ञा घेतली त्या नंतर रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. आणि ग्रामीण रूग्णालयच्या आवारात वृक्षारोपण काळाची गरज समजून वृक्षारोपण करण्यात आले. अशा प्रकारे विविध उपक्रम राबवित फार्मसी डे उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी ग्रामीण रूग्णालय चे वैद्यकिय अधिक्षक डॉ. वाघधरे तसेच सावली केमिस्ट चे अध्यक्ष गजानन टोंगे, केमिस्ट सचिव रवी ताटकोंडावार, सदस्य प्रवीण उरकुडे,वृषाली बेजगमवार, ममता ताटकोंडावार, कांचन शेंडे आणि सावली तालुक्यातील समस्त केमिस्ट उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये