Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीत हंसराज अहिर यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे ध्वजारोहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिना (राष्ट्रीय सेवादिन) निमित्य जिवती येथे विविध कार्यक्रमाचे आयेजन केले होते. १७ सप्टेंबर २०२३ रोज रविवार ला सकाळी ७ : ४० ला छत्रपती शिवाजी महाराज व संत रामराव महाराज पुतळ्याजवळील हनुमान मंदीर बसस्थानक परिसर येथे हंसराज अहिर, राष्ट्रीय अध्यक्ष (राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकार) यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख्याने उपस्थितीत अडॅ. संजय धोटे माजी आमदार, देवराव भोंगळे माजी जि.प. अध्यक्ष, सुदर्शन निमकर माजी आमदार, खुशाल बोंडे लोकसभा विस्तारक भाजपा, राजुभाऊ घरोटे जिल्हा अध्यक्ष किसान आघाडी भाजपा आदी उपस्थित होते.

हैदराबाद मुक्ती संग्राम दिन निमित्त झेंडावंदन करण्यात आले, भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ, आणि विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात, सामाजिक कार्यात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या तालुक्यातील व्यक्तींचा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. आणि त्यानंतर नगर पंचायत चे सफाई कामगारांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला. संबोधित करतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ही आज जन्मदिन असल्याचे नमुद करीत नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला तालुक्यातील उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष केशवराव गिरमाजी, माजी उपसभापती महेश देवकते, तालुका महामंत्री दत्ताभाऊ राठोड, तालुका महामंत्री सुरेश केंद्रे, अनुचित जाती तालुकाध्यक्ष प्रल्हाद मदने, गोपीनाथ चव्हाण, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोविंद टोकरे, माजी सभापती सुनील मडावी, सरपंच वर्षाताई जाधव, नगरसेविका उर्मिला बेल्लाळे, महिला तालुकाध्यक्ष अमृतवर्षा पिल्लेवाड, माधवराव कुरसंगे, राजेश राठोड, विजय गोतावळे, विठ्ठल चव्हाण, माधव निवडे, तालुका उपाध्यक्ष तुकाराम वारलवाड, संतोष जाधव, श्रीदास राठोड, सरपंच पुंडलिक गिरमाजी, आनंद कदम, अंबादास कंचकटले,मोहन पांचाळ, बालाजी भुते, मुनीर सय्यद, शिवाजी बोईनवाड, साहेबराव राठोड, बालाजी बिरादार, पार्वताबाई गवाले, विजयाताई चव्हाण, राज बेल्लाळे, बालाजी नलबले, चंदन राठोड, अनंता बावळे, सूर्यकांत खांडेकर, निजाम शेख, विष्णू जाधव, धनराज आडे, भारत चव्हाण, आनंद पवार, देविदास तोगरे, जयराम ठोंबरे, मारुती भानगीर, संबा शिंदे, संग्राम बाजगीर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंद टोकरे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये