ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची सभा संपन्न

पाच विविध योजनेतील १७२ प्रकरणे मंजूर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

नव्याने स्थापन झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची सभा दि. १२ सप्टेंबरला समितीचे अध्यक्ष विजय वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या समितीचे सचिव तथा तहसीलदार अनिकेत सोनवणे यांनी कामकाज पार पाडले. या सभेत संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ योजनेच्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून एकूण १७२ प्रकरणे मंजूर करण्यात आले.तर २९ प्रकरणे त्रुटीमुळे राखून ठेवण्यात आले आहे.

या सभेमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ योजनेचे एकूण ४४ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले.ते सर्व अर्ज मंजूर करण्यात आले , श्रावणबाळ सेवावृत्ती अनुदान योजनेच्या ९० प्राप्त अर्जांपैकी २९ अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित ठेवण्यात आले तर ६१ अर्जांना मंजुरी देण्यात आली. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ५४ प्राप्त अर्जांपैकी सर्वच अर्ज मंजूर करण्यात आले, इंदिरा गांधी विधवा योजनेतील प्राप्त १२ अर्ज मंजूर करण्यात आले, इंदिरा गांधी अपंग योजनेतील प्राप्त १ अर्ज मंजूर करण्यात आला.

या बैठकीला समितीचे सदस्य यशवंत वाघ, कल्पना चौधरी, विनोद पांढरे, दिनेश कोल्हटकर , प्रदिप देवतळे, विशाल ठेंगणे, नरेश बोरसरे, संदिप पाचभाई, नरेंद्र क्षिरसागर या योजनेचे तहसील कर्मचारी लिपिक ढोबळे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये