काँग्रेस कमिटीतर्फे तान्हापोळा महोत्सव उत्साहात साजरा
प्रथम पुरस्कारात दीप्तांश दुधे चि बाजी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार
चांद्रयान,शेतकरी आत्महत्या, ग्रामीण भागातिल जीवनमान, महिलांवरील अत्याचार,भ्रष्टाचार, महागाई या विषयावरील प्रतिकृतींनी महोसत्वाला लाभले अनन्य साधारण असे महत्व.
भारत हा एक कृषिप्रधान देश आहे.महाराष्ट्रात व त्यातल्यात्यात विदर्भात,पोळा हा एक शेतकऱ्यांचा मोठा सण आहे. आज सावली शहर काँग्रेस कमिटीतर्फे तान्हापोळा महोत्सव २०२३ मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.चांद्रयान,शेतकरी आत्महत्या,ग्रामीण भागातिल जीवनमान, महिलांवरील अत्याचार,भ्रष्टाचार, महागाई या विषयावरील प्रतिकृतींनी महोसत्वाला लाभले अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झाले.
आज तान्हापोळा महोत्सव २०२३ गुजरी चौक, सावली येथे भरला होता. हजारोच्या संख्येत लोकांची उपस्थिती दर्शवित बालगोपालांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.मनोरंजकात्म गोष्टी, सजावट,डीजे,संदल यामुळे वातावरण आनंदिमय झाले होते.स्पर्धेचा निकाल हा नंदीबैल सजावट व वेशभूषा यावर आधारित होता, सौ.रिंकी सुरमवार सौ.पायल राईंचवार यांनी केले. त्यात प्रथम पुरस्कार मा.विजयभाऊ वडेट्टीवार विरोधि पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांच्याकडून ११००१ रुपये दीप्तांश दुधे, द्वितीय पुरस्कार ७००१ रुपये संदीप गड्डमवार,अध्यक्ष भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली व उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्याकडून दक्ष सुरमवार, तृतीय पुरस्कार ५००१ रुपये रोहितभाऊ बोम्मावार,अध्यक्ष चंद्रपूर अर्बन मलटिस्टेट यांच्याकडून दिग्विजया सुरमवार तर चतुर्थ पुरस्कार ३००१ रुपये सौ.लताताई लाकडे, नगराध्यक्षा नगरपंचायत सावली यांच्याकडून श्रावणी सुरमवार यांना मिळाले.
यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यलवार,नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,माजि सभापती पं.स..विजय कोरेवार, चंद्रपूर अर्बन बँक मलटिस्टेटचे अध्यक्ष रोहितभाऊ बोम्मावार, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अमर कोनपत्तीवार,शहराध्यक्ष महिला आघाडी सौ.भारती चौधरी,बांधकाम सभापती सौ.साधना वाढई,महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे, नगरसेवक .प्रीतम गेडाम,.प्रफुल वाळके, नितेश रस्से,सचिन संगीडवार,तसेच नगरसेविका सौ.पल्लवी ताटकोंडावार, सौ.प्रियंका रामटेके,सौ.ज्योती गेडाम,सौ.सिमा संतोषवार, व प्रशांत राईंचवार, नितीन गड्डमवार,पिंटू गड्डमवार,अंकुश शेंडे,आकाश खोब्रागडे,निखिल दुधे,कमलेश गेडाम आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते कांग्रेस च्या वतिने आयोजित तान्हा पोळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.