Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फुगलेल्या धरणाचे दरवाजे उघडल्याने शेती सह अनेक गावे प्रभावित

उषाताई भोयर यांची प्रभावित गावाना भेट ; शेत जमीनी सह गावात घुसले पाणी ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सततच्या पावसामुळे धरने फुगली परिणामी ओव्हर फ्लो धरणाचे दरवाजे उघड़े केल्याने शेत जमीनी सह अनेक गावाना फटका बसून धान पिकासह गावे प्रभावित होत असल्याचे दिसुन येत आहे दरम्यान या गंभीर बाबीची दखल शासनाने घेऊन नुकसान ग्रस्त भागातील लोकांचे पंचनामे करुण त्वरीत मदत करावी असी मागणी जोर धरत असून पाण्यामुळे प्रभावित झालेल्या भागाची पाहणी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या उषाताई भोयर यानी केलि पोलिस विभागा सह महसूल विभागाच्या अधिका ऱ्यासी चर्चा करुण नुकसान ग्रस्त लोकांचे पंचनामे करुण त्वरित मदत करावी

अशी मागणी केलि तालुका लगत वाहना ऱ्या वैनगंगा नदीला गोसे चे पानी सोडल्याने वैनगंगा नदी दुथळी वाहन्यास सुरुवात झाली परिणामी तालुक्यातील करोली,निमगाव,निफन्द्र,बोरमाळा,आकापुर,थेरगाव,चिखली,दाबगाव,चक,आदी नदीलगत गावात पानी घुसले असून अनेक शेत जमीनी पाण्याखाली असल्याने शेतक ऱ्याचे मोठे नुकसान होत आहे गेली अनेक वर्षा पासून वैनगंगा नदी लगत असना ऱ्या याच भागाला पुराचा फटका बसत असून शेतक ऱ्याचे मोठे नुकसान होताना दिसते या भागाचे लोकप्रिय आमदार विजयभाऊ वडेटीवार यांचे नेहमीचा या भागाला मोलाचे सहकार्य मदत लाभली आहे यंदा तर पावसाने कहर केला गेली आठवाड़ा भरापासुन पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे राष्ट्रीय प्रकल्प गोसे दरवाजे उघड़े केल्याने वैनगंगा नदी दुथळी वाहन्यास सुरुवात झाली असून करोली आणि निमगावा सह परिसरात शेतक ऱ्याचे मोठे नुकसान होत आहे अनेक हेक्टर शेतजामिनी पण्याखाली असून गावात पानी घुसल्याने भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे याची गंभीर दखल घेत सावली तालुका कांग्रेस च्या महिला आघाडी च्या नेत्या उषाताई भोयर यानी पोलिस विभागा सह महसूल विभागाच्या अधिकाऱ्या सोभत प्रभावित झालेल्या नुकसान ग्रस्त भागाना भेट देऊन पाहणी केलि फुगलेल्या वैनगंगा नदिमुळे नदिकाठालगत होत असलेल्या नुक्सानिची पहाणी,पंचनामे करुण शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणीही यावेळी उषाताई भोयर यानी केली.

राष्ट्रीय प्रकल्प गोसे चे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदी दुथळी वाहन्यास सुरुवात होते त्यामुळे त्याचा फटका नेहमीच नदीकाठी असना ऱ्या गावाना होतो कधी गाव जलमय तर कधी शेती जलमय अशी अवस्था निर्माण होत असल्याने शेतक ऱ्याचे मोठे नुकसान होत आहे यांदाहि हिच परिस्थिति निर्माण झाल्याने प्रभावित नदी काठावरील नुकसान झालेल्या भागाची पाहणी करुण शासनाने त्वरित मदत करावी.
उषाताई भोयर
सावली तालुका महिला अध्यक्ष

वैनगंगा नदिला पुर आल्याने नदी काठावरिल शेतीचे मोठे नुकसान होत आहे अनेक गावात पानी शिरले धनपिक पण्याखाली आले त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितिची पाहणी करुण शासनाने त्वरित मदत करावी
लंकेश लाकडे
निमगाव

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये