ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित

सरपंच पदासाठी पुरुषांपेक्षा महिला राज जास्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचे सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत बुधवारला तहसिल कार्यालय, ब्रम्हपुरी येथे काढण्यात आल्या. यातून कहीं ठिकाणी खुशीचे वातावरण आहे तर काही ठिकाणी नाराजी आहे, असे संमिश्र चित्र पाहायला मिळाले. ब्रम्हपुरी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. ब्रम्हपुरीचे तहसीलदार सतिश मासाळ यांच्या उपस्थितीत पुढील २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत सरपंच आरक्षण ठरले. आरक्षण सोडत काढताना गावागावांतील अनेक राजकीय पुढारी, इच्छुक मंडळी उपस्थित होती.

यात आरक्षणाचा फटका बसल्यामुळे काही जणांच्या पदरी निराशा आली, तर पूरक आरक्षणामुळे सरपंचपदाची संधी मिळण्याच्या आशेमुळे बरेच इच्छुक कामाला लागले. विशेषतः राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यात काहीजणांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. तर काहीजणांच्या आशेवर पाणी फेरले गेल्याचे दिसून आले.

 ब्रम्हपुरी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीतून ठरले.या मधे पुरुषांपेक्षा महिलांनी आघाडी घेतली आहे ७५ पैकी ३८ जागा महिला राखीव आहेत. चौगान, गांगलवाडी, पिंपळगांव, खरकाडा, तोरगांव बूज, पारडगांव, आदी नेहमीच राजकीयदृष्ट्या चर्चेत राहणार्‍या गावांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण खुल्या गटाला लाभले. यातील काही ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे.

 सरपंच पदासाठी अनुसूचित जातीसाठी राखीव आरक्षणात चिंचोली बुज (महिला), हळदा (महिला), सावलगाव (महिला), तुलानमेंढा, चिचगाव, चिखलगाव (महिला), पांचगाव (महिला), कोसंबी खडसमारा, कहली, कालेता (महिला व माहेर ग्रामपंचायती समावेश आहे.

  अनुसूचित जमातीसाठी सरपंच पदाच्या राखीव आरक्षणात बोरगाव (महिला), अर्हेर नवरगाव, मालडोंगरी, तळोदी खुर्द (महिला), बेलगाव (महिला), व मांगली या ग्रामपंचायती समाविष्ट आहेत.

 तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आरक्षणात रानबोथली, जुगनाळा, चांदली (महिला), लाडज (महिला), गोगाव, बरडकिन्ही (महिला), आक्सापूर (महिला), जवराबोडी, मूई (महिला), मेंडकी, रामपुरी, आवळगाव (महिला), वांद्रा (महिला), बोडदा, मूडझा (महिला), कुडेसावली (महिला), कळमगाव, सायगाव, एकारा (महिला), भूज, व तुकुम या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

 तर सर्वसाधारण गटात झिलबोडी, अड्याळ जाणी, चौगान (महिला), बेटाळा, खेडमक्ता, तोरगाव खुर्द (महिला), नान्होरी, दिघोरी, नांदगाव जाणी (महिला), पिंपळगाव भो. (महिला), सोंदरी (महिला), सोनेगाव (महिला), गांगलवाडी, कन्हाळगाव (महिला), बोढेगाव (महिला), भालेश्वर (महिला), निलज, रुई, हरदोली (महिला), सुरबोडी, रणमोचन, खराकाडा (महिला), खंडाळा, उदापूर (महिला), चांदगाव, वायगाव (महिला), बल्लारपूर माल (महिला), चोरटी (महिला), कोथुळना (महिला), चकबोथली, पारडगांव, किन्ही (महिला), लाखापूर, तोरगांव बूज (महिला), कोलारी, किटाळी (महिला), चिचखेडा व मरारमेंढा या ग्रामपंचायती आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये