Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे अपघात विमा क्लेम रकमेचे वाटप

चांदा ब्लास्ट

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पगार होणारे जिल्हयातील ११५७९ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा सिडीसीसी बैंक सॅलरी पॅकेज अंतर्गत प्रत्येकी रू. ३०.०० लाख चा अपघात विमा बँकेतर्फे काढण्यांत आलेला आहे. मुल शाखेतअंतर्गत पगार घेणारे श्रीमती. विठाबाई मुन आश्रम शाळा डोंगरगाव ता. मुल येथील कर्मचारी है. अमित चंद्रप्रकाश पेंदोर यांचा दि. २३.०३.२०२४ रोजी दुदैवाने अपघाती मृत्यु झाला. तसेच यशवंतराव शिदि उच्च माध्यमिक विदयालय चिंचोर्डी ता. भद्रावती येथील शिक्षक कै. मिलींद नवनाथ वेल्हेकर यांचा दि. ०८.०१.२०२४ रोजी दुर्दैवाने अपघाती मृत्यु झाला. बँकेचे सिडीसीसी बैंक सॅलरी पॅकेज अंतर्गत बँकेच्या प्रमुख कार्यालयांत माजी विरोधी पक्ष नेते व मा. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, यांचे हस्ते कै. अमित चंद्रप्रकाश पेदोंर यांची आई सौ. मंदाबाई चंद्रप्रकाश पेंदोर यांना रू. ३०.०० लाख विमा क्लेम रक्कम अदा करण्यांत आली. तसेच कै. मिलींद नवनाथ वेलोकर यांची पत्नी श्रीमती. प्रनिता मिलींद वेल्हेकर यांना रु. ३०.०० लाख विमा क्लेम रक्कम अदा करण्यांत आली.

यावेळी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, संचालक सर्वश्री संदीपभाऊ गडुमवार,राजेशजी रथाताटे, संजयजी तोटावार, पांडुरंगजी जाधव, प्रकाश बन्सोड, विनायकजी बांगडे व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये