ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ ला स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ चे आयोजन करण्यात आले.

या निमित्ताने महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रामचंद्र वासेकर, डॉ. दिलीप कामडी,तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक व इतर विद्यार्थी यांनी राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षा सुरक्षित ठेवण्याची व स्वतः समर्पित होण्याची शपथ घेतली.

याप्रसंगी महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थी व स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. तसेच राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान सुद्धा राबवण्यात आला या उपक्रमास विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा सावलीचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये