Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूरच्या वतीने स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धनंजय गोरे, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन मनोहर बांद्रे यांनी केले. या उत्सवात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार मांडण्यात आले, तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विचारधारेचे महत्व आणि जिजाऊंच्या कर्तृत्वाचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन प्रा. चेतन दा. वैद्य यांनी केले.

या कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरणा देत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्व अधोरेखित केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये