Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय येथे बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदुर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स,या महाविद्यालयात दिनांक 23 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातील ताईत मा. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील ग्रंथालय व एनएसएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या संयुक्त जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शैलेंद्र देव होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा. रामकृष्ण पटले व डॉ. अजय कुमार शर्मा उपस्थित होते. जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही महापुरुषाच्या कार्याबद्दल प्रकाश टाकण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तत्कालीन परिस्थिती ओळखून नेताजींनी उचललेले पाऊले देशासाठी खरेच दिशादर्शक होते. तसेच महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हयात भर प्रयत्न केले.

महाराष्ट्राच्या राजनैतिक गती विधीवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा कटाक्ष विशेष रूपाने असायचा. हे याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून देव सर म्हणाले या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी हजर होते या कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल प्रा मनोहर बांद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा चेतन वैद्य यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये