सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव चा३२वा स्थापना दिन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती विरंगुळा भवन येथे साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदराव अहिरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुकरराव धुळे, प्रकाश खांडेभराड, रमेश नरोडे प्रकाश अहिरे,प्रा.अशोकराव डोईफोडे, गोविंदराव बोरकर उपस्थित होते.
सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे संचालन श्री.प्रकाश खांडेभराड यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंदराव बोरकर यांनी केले.