Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर तर्फे भव्य रक्तदान शिबिर

२६३ रक्तदात्यांनी केले रक्तदान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आजच्या धावपळीच्या युगात रस्ता अपघात व नव-नवीन आजारां मुळे रक्त पुरवठ्याची गरज वाढत चालली आहे. रक्त पुरवठ्याची कमतरता भासू नये व समोरील व्यक्तीला जीवनदान मिळावे या उध्देशाला लक्षात घेता अल्ट्राटेक कम्युनीटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूरने प्रत्येक वर्षा प्रमाणे या वर्षी वैद्यकीय महाविद्यालय, रक्त केंद्र विभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ए.सी.डब्ल्यू. स्पोर्टस क्लब आवारपूर सिमेंट वर्क्स येथे केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री. दिपक सुरणा (एफ.एच-टेक्निकल) यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपुर यांची उपस्थिती लाभली तसेच प्रमुख पाहूने म्हणून श्री. नमित मिश्रा (एफ.एच-,एचआर), श्री. सौदीप घोष (एफ.एच- माईन्स), श्री. नारायण दत्त तिवारी (एच.ओ.डी- ई.आर), डॉ. बबीता नरूला (सीएमओ), श्री. संजीत सोनी (मुख्याध्यापक एबीपीएस), श्री. सतीश मिश्रा, श्रीमती प्रियंका दिवे (सरपंच आवारपूर), श्री. अरुण रागीट (सरपंच बाखर्डी-पालगाव), श्रीमती संगीता मडावी (सरपंच नोकारी), श्रीमती संजना बोंडे (सरपंच सांगोडा), श्री. पुरुषोत्तम आस्वले (उपसरपंच नांदा), श्री. अरुण काळे (उपसरपंच हिरापूर), श्री. रत्नाकर चटप (ग्रामपंचायत सदस्य नांदा), डॉ. स्वप्नील टेंभे (टीएमओ कोरपना), डॉ. शेंडे (एमओ, पीएचसी नांदा) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना नमित मिश्रा यांनी सी.एस.आर च्या विविध कार्याची स्तुती केली व लोकांनी जास्त प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन सुद्धा केलेत तर दिपक सुरणा यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देत रक्तदान शिबिर सुरू करण्यास परवानगी दिली.

या रक्तदान शिबिरात एकूण २६३ लोकांनी स्वइच्छेने रक्तदान केलेत, त्यात महिलांचा, युवकांचा, कॉलनी रहिवासी व गावकऱ्यांचा सहभाग होता. प्रत्येक रक्तदात्यास चहा-नाश्ता व पौष्टिक आहार सुद्धा देण्यात आला.

या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्याकरिता सी.एस.आर. प्रमुख श्री. प्रतीक वानखेडे, श्री. संजय ठाकरे, श्री. देविदास मांदाळे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील, रक्त केंद्र विभागाचे पीआरओ श्री. पंकज पवार, डॉ. मिलिंद झाड़े व त्यांच्या संपूर्ण टीम ने अथक प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये